ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

तंटामुक्ती

नेवासा – तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायत ने 20 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. रांजणगावच्या सरपंच सौ कल्पनाताई सोपान लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा ग्रामसभा पार पडुन त्यामध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी एकनाथ चंद्रभान चौधरी तर उपाध्यक्षपदी नारायण रावजी तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या अगोदर तंटामुक्ती निवडीसाठी गावातील अनेक जण इच्छुक होते दोन गटात जोरदार रस्सीखेच चालू होती. परंतु गावातील सुज्ञ नागरिकांनी सदर निवड ही जनतेतूनच व्हावी अशी आग्रही मागणी केली होती .याकरीता कुठल्याही प्रकारचे गट तट नको अशी भूमिका मांडल्याने व दोन्ही गटात अध्यक्ष उपाध्यक्ष कोण ?यावर एकमत न झाल्याने अखेर दोन्ही गटांनी माघार घेत सर्वानुमते चौधरी व तांबे यांना पाठिंबा देण्याचे ठरवून निवड बिनविरोध करण्याचे ठरवले.

तंटामुक्ती

तसेच सरपंच कल्पनाताई लोखंडे यांनी देखील ही निवड जनतेतूनच व्हावी व त्यासाठी कुठलाही वाद विवाद नको असे आवाहन केल्याने ग्रामस्थांनी त्याला दाद दिली. तसेच ग्राम विकास अधिकारी रमेश गायके यांनी देखील शासनाचा जीआर सर्वांना माहिती करून देत ही निवड जनतेतूनच व्हावी व त्यासाठी कुठलीही मतदान प्रक्रिया नसते असे निदर्शनास आणून दिल्यानंतर ग्रामस्थांनी सदर निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले. शेवटी सर्व नागरिकांनी ही मागणी मान्य करत व पोलीस पाटील बबनराव शिंदे ,मोहन पंडित, बाबासाहेब आल्हाट, यांच्या पुढाकाराने ही निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी झालेल्या भाषणात पत्रकार आदेश जावळे म्हणाले की चौधरी व तांबे यांनी या अगोदर पंधरा वर्षे स्थापनेपासून तंटामुक्ती समितीत काम केलेले आहे त्यामुळे गावातील सर्व गोष्टींची त्यांना माहिती असून योग्य न्याय देण्याची भूमिका त्यांची नेहमीच असते.

तंटामुक्ती

पुढील काळात सुद्धा त्यांच्या माध्यमातून गावात शांतता सुव्यवस्था व भांडणाचे वाद योग्य रीतीने मिटवले जातील अशा प्रकारची ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष एकनाथ चौधरी म्हणाले की रांजणगावातील जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वासाला तडा जाणार नाही व गावात चांगल्या पद्धतीने काम करून आपलं गाव आदर्श बनण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दत्तात्रय वाकचौरे, नारायण चौधरी, विनायक चौधरी, शिवाजी वाकचौरे, गोविंद पेहरे, राजेंद्र पेहेरे, सोमनाथ चौधरी, बबन आल्हाट, रवींद्र कांबळे, पिनू पंडित, पत्रकार अशोक पंडित, उपसरपंच दाविद जावळे, गणेश कापसे, यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newasa news online
तंटामुक्ती
तंटामुक्ती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तंटामुक्ती
तंटामुक्ती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तंटामुक्ती