ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अपघात

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई फाटा येथील एका हाॅटेल समोर दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गव्हाचे पोती भरलेला ट्रक हम क्रमांक एम एच १८ ए. ए. ९४९७ याच्या मध्ये मध्यप्रदेश येथून गव्हर्नर पोती लोड करुन संभाजी नगर मार्गे अहमदनगर येथे खाली करण्यासाठी जात असताना शिंगवेतुकाई शिवारात हायवेवर एका हाॅटेल जवळ असताना पाठीमागील बाजुने लक्झरी बस क्रमांक एम पी. १३ पि. ८८६१ ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व भरधाव वेगाने चालवून फिर्यादी यांचे ताब्यातील ट्रक ला पाठीमागून जोराची धडक देवुन ट्रक चे मोठे नुकसान केले

बस

बस मधील चार पाच प्रवासी यांचे दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालक रियाजअहमद गुलाम खान वय ५४ रा. पंधाना जिल्हा खंडवा यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. ३९१/२०२४ बिएनएस चे कलम २८१,१२५(अ)(ब), ३२४(४)(५), मो. वा. का. कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. काॅ. एन आर. तुपे हे करत आहेत.

बस
बस
बस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बस
बस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बस