नेवासा : मराठा-कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी काल शनिवारी (दि.२१) नेवाश्यात सकल मराठा समाजाकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे व सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी या ठिकाणी पाच दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनास राज्यभरातून सकल मराठा समाजाकडून पाठींबा मिळत आहे. नेवासा तालुक्यातील मराठा बांधवाकडून देखील या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नेवासा शहरातील गणपती मंदिर चौकात लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी संभाजी माळवदे यांनी काल मराठा समाजाची आर्थिक शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती घसरली असून आरक्षणामुळे रोजगार, शिक्षणच्या संधी निर्माण होतील, सामाजिक उन्नती होवून सर्वांगिण विकास होईल. त्यासाठी आरक्षणाचा लढा निकराने लढावा लागेल, असे आवाहन केले. तर अनिल ताके यांनी यापुढे आरक्षणासाठी लढा देणाऱ्याच्या पाठीशीच ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी रावसाहेब घुमरे, किशोर जोजार, सादिक शिलेदार, कल्याणराव पिसाळ, गणेश झगरें, आण्णासाहेब पटारे, नीलिमा वाबळे, जयश्री शिंदे, राजेंद्र वाघमारे, संदिप आलवणे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनात सर्वपक्षातील मराठा बांधव सहभागी झाले. तसेच मुस्लिम समाज व इतर समाजाकडूनही या आंदोलनास पाठींबा देण्यात आला. यावेळी लक्ष्मणराव जगताप,गणपत मोरे, पी. आर. जाधव, प्रकाश निपुंगे, अॅड. कारभारी वाखुरे, अंजुम पटेल, सोमनाथ गायकवाड, जयवंत मोटे, संदीप आलवणे, डॉ. करण घुले, किशोर गारुळे, संभाजी पवार, केतन काळे, दिगंबर अवारे, सुनील हापसे, गणेश चौगुले, अंबादास लष्करे, नीलम डौले, उषाताई मारकळी, लीलाबाई मारकळी, राम मगरे, उमेश ताकटे आदीसह नेवासा तालुक्यातील मराठा आंदोलक सहभागी झाले होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.