नेवासा – कोतवालाना अद्याप पर्यंत चतुर्थ श्रेणी चा दर्जा मिळाला नाही त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळत नाही कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कार्यकारणी यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या आंदोलनामध्ये राज्यातील हजारो कोतवाल सहभागी होणार असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे यात संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा कोतवाल संघटना यात सहभागी होत आहेत अशी माहिती अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कोतवाल संघटनेचे योगेश मिसाळ यांनी पत्रकारांना दिली.
ते बोलताना म्हणाले की कोतवाल हा महसूल यंत्रणेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे मात्र कोतवालाना अद्याप चतुर्थ श्रेणी प्राप्त झालेली नाही यासाठी मंगळवारपासून अहिल्यानगर जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे व त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे.
त्यानंतर बुधवारी 25 पासून राज्यभरात काम बंद आंदोलन केले जाणार आहे जर या दोन दिवसात शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास दि.26 पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ यांनी दिला आहे.
तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वं कोतवाल कर्मचारी यांनी एक दिवसीय आंदोलन मध्ये सहभागी होणे करीता मंगळवारी सकाळी न चुकता हजर राहावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ यांनी केले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.