गंगापुर – येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने बांगलादेश येथे अल्पसंख्यांक हिंदु कुटुंबावर होत असलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ, गोहत्या व लव जिहाद आणि प.पु. महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज मठाधिपती गोदाधाम सरला बेट यांचे स्मरणार्थ दिनांक २३/०९/२०२४ रोजी १०:०० ते दुपारी २.०० वाजे दरम्यान गंगापुर शहरात हिंदु गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा हा महाराणा प्रताप चौक येथुन सुरुवात होवुन पुढे गणपती मंदिर-छ. शिवाजी महाराज चौक डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर चौक, राजीव गांधी चौक, तिनकोनी चौक, जुनी भाजी मंडी, मारुती चौक जिजामाता चौक, गणपती मंदिर येथे मोर्चाचा समारोप होणार आहे.
तरी मोर्चा दरम्यान वाहतुक कोंडी होवून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्याता नाकारता येंत नाही. याकरीता दिनांक २३/०९/२०२४ रोजी चे ०८.०० ते १७.०० वा पर्यंत सर्व वाहतुक खालील मागाने वळविण्यात येत आहे.
१) छ. संभाजीनगर ते अहमदनगर NH-753 रोडने छ. संभाजीनगर वाकुज गंगापुर चौफुली- गंगापुर शहर मार्गे वैजापूरकडे जाणारी सर्व जड अवजड वाहतुक एस- क्लब छ. संभाजीनगर शहर येथुन सावंगी वैजापूरकडे जातील.
२) बिडकीनहुन छ. संभाजीनगर ते अहमदनगर NH-753 रोडने इसारवाडी फाटा- गंगापुर चौफुली- गंगापुर शहर मार्गे वैजापूर कडे जाणारी सर्व जड- अवजड वाहतुक एस क्लब- सांवगी चौक लासुर स्टेशन येथुन वैजापुर मार्गे जातील.
३) वैजापुरहुन SH-179 (वैजापुर ते गंगापुर) ने गंगापुर कडे येणारी सर्व जड वाहतुक वैजापुर दहेगाव बंगला सावंगी चौक (लासुर स्टेशन) येथुन-पोळरांजनगाव – एस- क्लब छ. संभाजीनगर कडे येतील.
४) लासुर स्टेशनकडुन सावंगी चौक – शिल्लेगाव – गंगापुर शहरातुन अहमदनगरकडे जाणारी सर्व जड अवजड वाहतुक सावंगी चौक दहेगाव बंगला वैजापुर-मार्गे जातील.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.