नेवासा – आज समर्पण करिअर अकॅडमी (नेवासा फाटा) येथे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , राजमुद्रा चौक येथून मिरवणूक रॅलीचे प्रारंभ झाला पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक, व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक असे भव्य दिव्य रॅली , फटाक्यांचा आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक रॅली काढण्यात आली त्यानंतर सप्तपदी मंगल कार्यालय नेवासा फाटा येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला तेव्हा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तेव्हा या कार्यक्रमाला उपस्थित नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय धनंजय जाधव साहेब तसेच मुकिंदपूर गावचे सरपंच माननीय श्री सतीश (दादा) निपुंगे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय श्री रामदासजी गोल्हार साहेब,मुकिंदपुर गावचे पोलीस पाटील श्री आदेश साठे सर केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू दळवी सर व तालुका अध्यक्ष माननीय श्री योगेश राऊत सर, लिटल बर्ड्स स्कूलचे संचालक माननीय श्री सुशांत हूसाळे सर ,पत्रकार माऊली सिन्नरकर, श्री गणेश झगरे,श्री राजू मोरे सर, निमसे भाऊ, पालक निकम सर, हूसळे सर ,रोडगे सर तसेच समर्पण अकॅडमीचे संचालक श्री विकास शेलार सर , सहसंचालक श्री राहुल शुक्रे सर फिजिकल ट्रेनर श्री भारत नेव्हल सर व समर्पण अकॅडमीतील आजी-माजी विद्यार्थी यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पाडला.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.