ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

धनगर


गणेशवाडी – धनगर जमातीला एस. टी.आरक्षण अंमलबजावणी करिता सुरु असलेल्या पंढरपुर, लातूर, नेवासा येथील आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दाखवत पांढरी पुल येथे काल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.
महाराष्ट्रात धनगर जमात पिढ्‌यानपिढ्या मेंढपाळ चा व्यवसाय करीत असून ते पशुपालक आहेत. १९५६ च्या एस. सि / एस.टी यादीत महाराष्ट्रातील अनु. जमातीच्या यादीत अनु.क्र. ३६ वर “धनगड” आल्याने धनगर जमात त्यांच्या संवैधानिक हक्कापासून गेली ६८ वर्ष वंचित आहे. वास्तविक धनगड नावाची जमात महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कोठेही अस्तित्वात नाही.

धनगर

महाराष्ट्र सरकारने मा. मुंबई उच्च न्यायालयात लेखी तीन वेळा लिहून दिले आहे की, महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाहीत, परंतु धनगर आहेत आणि अस्तित्वहीन जमातीला आरक्षण देता येत नाही. त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) प्रमाणपत्र देण्यात यावे. हि विनंती धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बाळासाहेब अर्जुन पिसाळ सोमनाथ म्हातारदेव देवकर रा. खोसपुरी यांचे नेतृत्वाखाली अर्धा चालले या रास्ता रोको मध्ये परीसरातील धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनई पोलीस ठाण्याचे पोसई सुरज मेढे यांनी निवेदन स्विकारले. या वेळी पोलीस अंमलदार रामदास तमनर,रवींद्र गर्जे, दत्ता गावडे, ज्ञानेश्वर आघाव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

धनगर
धनगर
धनगर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धनगर
धनगर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धनगर