नेवासा – गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर राज्य सरकारने जाहीर करूनही वाटप न झालेला आनंदाचा शिधा तालुक्यातील लाभार्थ्यांना त्वरित वितरित न केल्यास तहसीलमध्ये धरणे, बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा नेवासा तालुका आम आदमी पार्टीने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
यासंदर्भात नेवासा तहसीलदार तसेच पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर राज्य सरकारने आनंदाचा शिधा वितरित केलेला आहे. राज्याच्या इतर भागातील जनतेला आनंदाचा शिधा वितरित झालेला असताना नेवासा तालुक्यात त्याचे अद्याप वितरण झालेले नसल्याच्या तक्रारी असल्याकडे या निवेदनात संबंधितांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
वास्तविक हा उपक्रम राज्य शासनाने गणेशोत्सवादरम्यान राबविलेला असल्याने त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी याच काळात होण्याची अपेक्षा व्यक्त करून गणेशोत्सव संपून मोठा कालावधी उलटून जाऊनही तालुक्यातील लाभार्थ्यांना याचे वितरण झालेले नाही, ही अत्यंत गंभीर बाब असून राज्य शासनाच्या उदात्त हेतूला काळिमा फासणारी असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे.
त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाने मंजूर केलेल्या आनंदाचा शिध्याचे तालुक्यातील लाभार्थ्यांना विनाविलंब तातडीने वितरण करावे, तसेच हा शिधा थेट शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहचण्याची तसेच याच्या वितरणात कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे सूचित करून अन्यथा नेवासा तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने कुठलीही पूर्वासूचना न देता आपल्या कार्यालयात लोकशाही मार्गाने धरणे, बोंबाबोंब आंदोलन करण्याचा गर्भीत इशारा आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष ऍड. सादिक शिलेदार, सचिव प्रवीण तिरोडकर, शहराध्यक्ष संदीप आलवने, आण्णा लोंढे, भैरवनाथ भारस्कर, विठ्ठल मैन्दाड, सलीम सय्यद, करीम सय्यद, विठ्ठल चांडे, किरण भालेराव, सुखदेव भूमकर, सुमित पटारे, राजू महानोर, बापूसाहेब निर्मळ, बाबा वडगे, यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.