नजिक चिंचोली येथील जागरूक देवस्थान खडेश्वरी माता परिसरात प्लेविन ब्लॉक, तसेच झाडे लावुन सु-शोभीकरण, खंडेश्वरी देवी परिसरात करण्यात आले त्याचा उद्घाटन समारंभ खडेश्वरी माता देवस्थानचे महंत गणेशानंदगिरीजी महाराज तसेच तालुक्याचे आमदार शंकररावजी गडाख यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार गडाख बोलताना म्हणाले की ब्रह्मदेवालाही लोक शिव्या शाप देतात मी त्यातून कसा सुटणार परंतु कितीही शिव्या शाप दिल्या तरी मी चांगले काम करण्याचे सोडणार नाही या चिंचोली परिसराला लोकनेते स्व. मारुतीरावजी घुले पाटील साहेबांचा वारसा लाभलेला आहे.ते शेतकऱ्याबद्दल पुढे बोलताना म्हणाले शेतकऱ्यांसाठी पावसाचा मोठा दिलासा आपल्या तालुक्याला लाभला आहे तसेच आपल्या परिसराला लाभदायक धरण जायकवाडी धरण ही भरले आहे.
तसेच या धरणाच्या माध्यमातून पाट पाण्याचे नियोजन कसे करता येईल याचा माझा नेहमी प्रयत्न असणार आहे उजवा कालव्या साठी 75 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच त्याची दुरुस्ती करून तीस दिवसांमध्येच रोटेशन सोडण्याचा माझा प्रयत्न होता परंतु सरकारने निधी अडवल्यामुळे ते काम बंद झाले त्या कामामुळे तिस दिवसांमध्येच नेवासा, शेवगाव, पाथर्डी, याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार होता धरण भागाला 18 टीएमसी जरी धरण भरले तरीही लाभ भेटणार होता परंतु सरकारने निधी थांबवल्यामुळे ते काम मी पुढे करू शकलो नाही .
तसेच कमी पाण्यामध्ये लवकरात लवकर रोटेशन कसे करता येईल यासाठी 18 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला होता परंतु आपन विरोधी पक्षात असल्यामुळे तो प्रस्ताव थांबवला गेला तसेच महाराज लोकांच्या आशीर्वादाने पुढील येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये सरकार आले तर पहिला हा पाट पाण्याचा प्रस्ताव मजूर करून हे पाटण्याचे काम मार्गी लावणार आहे .
तसेच विजेच्या बाबतीमध्ये 70 ते 75 हजार कोटी रुपयाचा प्रस्तावही आपल्या नेवासा तालुक्यासाठी टाकला आहे तसेच विजेची उपलब्धता जास्त वीज मिळाल्या साठी नवीन सबस्टेशन कसे तयार करता येईल याचाही प्रस्ताव मी टाकला आहे .तो प्रस्ताव मंजूर झाला तर वीस ते पंचवीस वर्ष विजेचा प्रश्न कायमचा सुटेल हे दोनच प्रश्न महत्त्वाचे सुटले तर यातून तालुक्यात भरीव काम होणार आहे. त्यातून बेरोजगाराचे, रस्त्याचे ,डोलाचे तसेच पिण्याच्या पाण्याची मंजूर केलेली योजना ही जवळपास पूर्णत्वास आली आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचे साथ हे विकास कामाला हवी आहे असे भावनिक आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
यशाचे गणित जर जुळवायचे असेल तर जुळवा जुवळी करावे लागते आणि ते गणित सर्वांना धरूनच करावे लागते
ज्या ज्या वेळी मी खडेश्वरी देवस्थान येथे दर्शनाला येतो तेव्हा खडेश्वरी प्रांगणामध्ये नेहमी सुशोभीकरण होताना पाहीले आहे परिसर हा सुंदर परिसर आहे त्यामध्ये नजीक चिंचोली करांचचा मोठा मोलाचा वाटा आहे. माझे तत्व आहे काम करत राहायचं झाडे लावत राहायचं रस्ते करत राहायचे लोक हे नाव ठेवत असतात नंतर समजा विचार करत असतो चांगले कोण व वाईट कोण तसेच आपल्या सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने चांगले काम करण्याचे मी ठरवले आहे व या पुढेही आपल्या आशीर्वादाने हा वारसा तालुक्यामध्ये काम करत चालवायचा असल्याचे आमदार गडाखाने बोलताना सांगितले. ते नजीक चिंचोली येथील खंडेश्वरी देवस्थान येथील सुशोभीकरण तसेच कीर्तन मंडपाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी खंडेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंद गिरीजी महाराज म्हणाले की गडाख कुटुंबीय ही नेहमी साधुसंतांचा आदर करणारे कुटुंब आहे ते नेहमी धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात आमदार शंकरराव गडाख साहेबांच्या माध्यमातून चिंचोली विविध विकास कामे तसेच खडेश्वरी देवस्थान येथे सुशोभीकरणाचे काम होत असल्याने मोठा आनंद होत आहे .
देवकार्य, धर्मकार्य, करताना गडाख कुटुंबीय नेहमी अग्रेसर असते आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून खडेश्वरी देवस्थान येथील झालेल्या सुशोभीकरण कामाचे मी मनापासून आभार मानत आहे. व त्यांना महंत गणेशानंदगिरीजी महाराज यांनी आमदार गडाखांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा आशीर्वाद दिले. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले नजिक चिंचोलीकर ग्रामस्थ ही नजीक चिंचोली खडेश्वरी देवस्थान येथे नेहमी परिश्रम घेत असतात त्यांचाही मोठा मोलाचा वाटा या देवस्थान मध्ये आहे.
यावेळी नजीक चिंचोली चे सरपंच शिवाजी पाठक बोलताना म्हणाले की आमदार शंकरराव गडाख साहेबांनी कितीही नवीन माणसे जोडले तरी आम्ही जुने माणसे एकनिष्ठतेने त्यांच्या मागेच उभे राहू व त्यांना पुन्हा एकदा आमदार करून नामदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तसेच आमदार साहेबांच्या माध्यमातून खडेश्वरी देवस्थान असेल तर तसेच नजीक चिंचोली गावामध्ये विविध विकास कामे मागील पाच वर्षांमध्ये करण्यात आली आहे .जे राहिलेली काम आहेत तेही पुढील काळामध्ये आमदार साहेब निश्चित स्वरूपात पूर्ण करतील असा विश्वास नजीक चिंचोलीचे यशस्वी उद्योजक शिवाजी पाठक यांनी आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त केला.
या कार्यक्रम प्रसंगी ह.भ.प गणेशानंदगिरीजी महाराज,भ. प भांगचंद महाराज पाठक, सरपंच भागचंद चावरे , ह .भ. प. भाऊसाहेब पाटील कडू, ह .भ .प महादेव महाराज धाडगे, प्रसिद्ध उद्योजक शिवाजी पाठक, भेंडा गावचे सरपंच वैभव नवले, चावरे साहेब, काशिनाथ अण्णा नवले, कुमार नवले, बाळासाहेब नवले, नामदेव निकम, बाबुळखेडा सरपंच ज्ञानेश्वर माऊली औताडे, दिघी सरपंच सचिन नागवडे, बबनराव नागवडे, दीघी माजी सरपंच संजय नागवडे, ईश्वर पाठक, किशोर विधाटे, दत्तात्रेय काळे , रंभाजी ब्राह्मणे, पप्पू भक्त, गोवर्धन काळे, सलाबतपुर विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव संभाजी नवले, नजीक चिंचोली उपसरपंच लक्ष्मण जाधव, कैलास धाडगे, संजय आढागळे, गोवर्धन पाठक, ज्ञानदेव गाडे, बाळासाहेब पाठक, सोसायटीची व्हॉइस चेअरमन कृष्णा महाराज धाडगे, बाबासाहेब चौगुले, अशोक चौगुले, दिगंबर पाठक, ग्रामसेव कनरसाळे भाऊसाहेब उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागचंद महाराज पाठक यांनी केले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.