दक्षिणेचे खासदार निलेश लंके नेवासा तालुका दौऱ्यावर
नेवासा – दक्षिणेची खासदार निलेश लंके आज नेवासा तालुक्यातील दौऱ्यावर होते ते पिचडगाव येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मित्रांच्या गाठी भेटीसाठी मी नेहमीच नेवासा तालुक्यामध्ये येत असतो नेवासा तालुक्यामध्ये माझा जीवाभावाचा मोठा मित्र परिवार आहे.
राजकारणा पलीकडेही माझे मित्रत्वाचे संबंध नेवासा तालुक्यामध्ये असल्यामुळे मी नेहमी तालुक्यात येत असतो खासदार निलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्यांना महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या रणनीती व जागा वाटप संदर्भात प्रश्न विचारले असता ते बोलताना म्हणाले की मी मोठा नेता नसून एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून जेष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच जयंत पाटील साहेब उद्धव ठाकरे साहेब हे निर्णय घेतील त्या संदर्भात भाष्य करणे मी उचित ठरणार नाही असे त्यांनी बोलताना सांगितले.
त्यांचा पिचडगाव येथील हनुमान मंदिर सभामंडपामध्ये युवकांनी मोठा सन्मान सोहळा केला .
त्यांनी सर्व युवकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या नंतर त्यांनी सलाबतपुर येथील युवकांशी संवाद साधला त्यांचा सलाबतपुर युवक मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या सन्मान करण्यात आला.
त्यानंतर त्यांनी शिरसगाव येथे युवक मित्रांना भेटी देत शिरसगाव येथे त्यांनी भोजन केले. खा.निलेश लंकेच्या नेवासा तालुक्याच्या दौऱ्याने युवकांमध्ये नवीन नवचैतन्य पहावयास मिळत होते. ते बोलताना म्हणाले की आमदार शंकरराव गडाख हे नेवासा तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे कर्तुत्ववान दमदार नेतृत्व आहे त्यामुळे नेवासा तालुक्यामध्ये मी कोणत्याही राजकीय भूमिकेतून आलो नसून मी फक्त मित्र परिवाराच्या भेटी-गाठीसाठी नेवासा तालुक्यामध्ये नेहमी येत असतो त्याच अनुषंगाने आज मी नेवासा तालुका दौऱ्यावर आलो आहे.
या दौऱ्याच्या दरम्यान नेवासा फाटा, पिचडगाव, गोंडेगाव चौफुला, सलाबतपुर ,गीडेगाव शिरसगाव, अदी गावांच्या युवकांनी फटाके वाजवत श्री फळ, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. खासदार निलेश लंकेनी सर्व युवकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.