नेवासा – तरुण हा गीतेचा आत्मा आहे तर तारुण्य हा ज्ञानेश्वरीचा गाभा आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. समृद्ध समाजनिर्मितीसाठी तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, समजून घेऊन कृती केली पाहिजे.” असे प्रतिपादन श्री संत सेवा संघाचे साधक कार्यकर्ते मंगेश पडवळ यांनी केले. मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. श्री संत सेवा संघाच्या माध्यमातून श्रीज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या रचनांवर आधारित चित्रप्रदर्शन मालिका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पावरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवण्यात आली. प्रत्येक ओवी व ओवीवर आधारित निरूपण श्री संत सेवा संघाचे साधक मंगेश पडवळ यांनी केले.
विद्यार्थ्यांना संत साहित्याची गोडी लागावी म्हणून संतांनी ग्रंथरूपाने मांडलेले ज्ञान चित्रप्रदर्शनरूपाने आणि इतर विविध २६ उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य गेली २७ वर्षे श्री संत सेवा संघाच्या माध्यमातून पूजनीय संजय गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. पडवळ पुढे म्हणाले, “श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत. ज्ञानेश्वरी रचनास्थान असलेल्या व माऊली ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासे नगरीत ज्ञानार्जनाची संधी मिळाली आहे. या महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे.”
महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.राधाताई मोटे यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यश संवाद विभागाचे प्रा.देविदास साळुंके यांनी निवेदन केले. आभार प्रदर्शन प्रा.गोवर्धन रोडे यांनी केले. कार्यक्रमाला श्री संत सेवा संघाचे प्रवीण लोखंडे, बाबासाहेब शिंदे तसेच महाविद्यालायचे प्रा.हरिश्चंद्र माने, प्रा.संजय घावटे उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.