नेवासा – तालुक्यातील भेंडा येथील ३३ के व्ही सबस्टेशन वरून शेतीसाठी होणाऱ्या वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मर मधून रात्री सिंगल फेज वीज दिली जाते परंतु दिवसा मात्र दिली जात नाही ती द्यावी या मागणीसाठी २६ तारखेला ११ वा भेंडा सबस्टेशन येथे धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले होते त्यामुळे आंदोलन अगोदरच एक दिवस महावितरणने दिवसा सिंगल फेज सुरु केल्याने उद्याचे धरणे आंदोलन स्थगित केल्याचे लोकनियुक्त सरपंच श्री शरदराव आरगडे यांनी सांगिलते
भेंडा सबस्टेशन अंतर्गत भानसहिवरा गोंडेगाव रांजणगाव अशा फिडरवरून लाईट दिले जाते थ्री फेज लाईट ज्या आठवड्यामध्ये दिवस असते त्या आठवड्यामध्ये सिंगल फेज लाईट शेतीच्या वीज पुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मर मधूनच वाड्यावस्त्यासाठी दिले जाते परंतु ज्या आठवड्यामध्ये थ्री फेज रात्री असते तेव्हा दिवसा सिंगल फेज लाईट दिली जात नव्हती.
त्यामुळे नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण होते, शाळेतील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो,महिलांच्या कौटुंबिक कामासाठी वीज महत्वाची आहे अशा पद्धतीने वीज खूप महत्वाची असताना नवीन कुठलाच खर्च न करता सदरची वीज देणे शक्य होते
परंतु सिंगल फेजच्या लाईटसाठी गावठाणच्या ट्रान्सफार्मरची मागणी करायला सांगितले जायचे हे चुकीचे धोरण होते
गावठाणचे ट्रांसफार्मर जो पर्यंत होत नाहीत तो पर्यंत शेतीचा वीज पुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मर मधूनच सिंगल फेज वीज दिली जावी त्यासाठी गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी ११ वा धरणे आंदोलन करणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी श्री बडवे साहेब मा कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कपंनी नेवासा यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले होते.
वाड्यावस्तीवर नागरिकांना घराचे कोटेशन भरायला लावू असे आश्वासन दिल्याने श्री बडवे कार्यकारी अभियंता व सहाय्य्क अभियंता श्री खार्वे साहेब विद्युत वितरण कपंनी नेवासा यांनी वीज सोडण्याची तात्काळ कार्यवाही केली सिंगल फेज वीज सोडण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याने लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांचे सौंदाळा, नागापूर, रांजणगाव, कारेगाव, गोंडेगाव इत्यादी गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन व आभार मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.