पिंगेवाडीत शेतकरी – शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन
नेवासा – श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने मार्फत शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी गावात कृषक समृद्धी सप्ताह निमित्ताने शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शेतीचे नफ्या- तोट्याचे गणित जुळवून शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र दहिगाव- ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक यांनी यावेळी केले. भारतातील या कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल “कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताह” साजरा केला जात आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
उन्हाळी कांदा पिकाची रोपवाटिका ते काढणी चे नियोजन कसे असावे यावर विस्तृत अशी चर्चा डॉ. कौशिक यांनी शेतकऱ्यांसोबत केली. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ नारायण निबे यांनी ऊस पिक उत्पादन वाढीसाठी बेणे बदल करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. ऊसाचे खोडवा पीक घेताना पाचट व्यवस्थापन, बुडख्या छाटणी, खत व्यवस्थापन यावर केव्हिके चे शास्त्रज्ञ सचिन बडधे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे इंजि. राहुल एस पाटील, प्रकाश बहिरट यांनीदेखील शेताऱ्यांशी संवाद साधून शेतीतील विकसित तंत्रज्ञानाच्या केव्हिके द्वारा आयोजित कृषि प्रदर्शनातील केव्हीके उत्पादनांची व यंत्रांची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी कृषि सहाय्यक बद्री लांडगे, प्रभात सीड चे सतीश तानवडे, गोमाता मिल्क चे संचालक दत्तात्रय तानवडे, युवा शेतकरी गंगाराम जाधव, अण्णासाहेब जाधव, रमेश तानवडे, नवनाथ घुले, शहादेव हजारे इ. उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या कापूस प्रक्षेत्राला तर तानवडे यांच्या गोमाता मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पाला केव्हीके शास्त्रज्ञांनी भेट दिली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.