ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ahmednagar News

नेवासा – बिटकॉइन ट्रेडिंम मध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नेवासा येथील कापड व्यावसायिकाची १५ लाख दोन हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मुकेश भगवानलाल शिंगी (वय ३२ रा. बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, कडू गल्ली, नेवासा) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी मंगळवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका टेलिग्राम आयडी धारक व्यक्तीविरोधात फसवणूक, आयटी अॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक

फिर्यादी यांना २९ मे २०२४ रोजी त्यांच्या टेलिग्राम आयडीवर एका अनोळखी टेलिग्राम आयडीवरून मेसेज आला. यामध्ये बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे सांगितले होते. तसेच एक लिंक पाठवली होती व त्या लिंकव्दारे ट्रेडिंग खाते उघडेण्यास व दिलेल्या यूपीआयआयडी, बँक खात्यावर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकीसाठी पैसे पाठविण्यास सांगितले गेले होते. फिर्यादीने त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन सांगितल्या प्रमाणे लिंक ओपन करून ट्रेडिंग खाते उघडले.त्या व्यक्तीने पाठविलेल्या यूपीआय आयडी व बँक खात्यावर २९व ३० मे २०२४ रोजी एकुण १५ लाख दोन हजार ८०० रूपये पाठविले.

फसवणूक

दरम्यान, फिर्यादी यांनी संबंधीत व्यक्तीला टेलिग्रामवर मेसेज करून ट्रेडिंगमध्ये झालेला नफा व गुंतवणुकीची रक्कम काढून घेण्यासाठी विचारणा केली असता संबंधीत व्यक्तीने फिर्यादीला सांगितले की, नफा व गुंतवणुक केलेली रक्कम काढून घेण्यासाठी अजून टास्क पूर्ण करावे लागेल. फिर्यादी यांनी त्या व्यक्तीकडे वारंवार संपर्क करून भरलेली रक्कम व ट्रेडिंगमधील टास्क पूर्ण करून झालेला नफा मागितला. परंतू त्याने फिर्यादीला पैसे दिले नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली. दरम्यान, येथील सायबर पोलिसांनी तक्रारीची चौकशी करून मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहेत.

newasa news online
फसवणूक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

फसवणूक
फसवणूक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

फसवणूक