ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

खो-खो

नेवासा : अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व रेसिडेन्सीयल हायस्कूल शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा शेवगाव येथे 19/09/2024 रोजी पार पडल्या त्या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल गेवराई तालुका नेवासा या विद्यालयाच्या 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला व सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. खेळाडूंना विद्यालयाचे मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षक श्री संजय राजगुरू सर, प्रशिक्षक श्री शोएब पठाण सर श्री नारायण कडूपाटील सर, श्री सचिन कर्डिले ,श्री अभिजीत पाटेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

खो-खो

विजयी संघाचे भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र नलगे सर सचिव श्री प्रकाश जाधव सर खजिनदार श्री हनुमंत पाटील सर , माजी अध्यक्ष श्री जे एम कल्हापुरे सर संचालिका सौ अलका पाटील मॅडम, संचालक श्री विनायक कल्हापुरे, व राजेंद्र जंगले सर्व संस्था पदाधिकारी व गेवराई गावचे सरपंच, चेअरमन सर्व क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी विद्यालयाचे माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले. तसेच नेवासा तालुका क्रीडा अध्यक्ष श्री नारायण कडूपाटील व श्री तूवर पाटील सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

खो-खो
खो-खो

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खो-खो
खो-खो

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खो-खो