ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

उपोषण


नेवासा – तालुक्यातील सर्व नोंदीत बांधकाम मजुरांनी जिल्हा परिषद अहमदनगर येथे 90 दिवसाच्या ग्रामपंचायतीच्या बांधकाम मजूर म्हणून असलेल्या दाखल्यासाठी तीन महिन्यांपूर्वी धरणे आंदोलन केले. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी दोन वेळा ग्रामसेवकांना दाखले देण्याकरिता लेखी आदेश दिले. तरीही ग्रामसेवकांनी दाखले देण्यास टाळाटाळ केली. म्हणून पंचायत समिती नेवासा या ठिकाणी दिनांक रोजी गटविकास अधिकारी यांच्या दालनात धरणे आंदोलन व ठिय्या आंदोलन करण्यात आले. तरीही ग्रामसेवकांचा अडेलट्टुपणा कायम होता. कामगार विभाग अहमदनगर व पंचायत समिती नेवासा यांची दाखला देण्याबाबतची समन्वय बैठक पंचायत समिती नेवासा येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनात झाली. त्यात ग्रामसेवकांनी बांधकाम कामगार असल्याची खातर जमा करून दाखले देण्याबद्दल निर्णय घेण्यात आला.

उपोषण

परंतु वरिष्ठांचे आदेश न पाळत ग्रामसेवकांनी खऱ्या मजुरांना दाखले देणे नाकारले. शासनाचे बांधकाम मजुरांना ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने दाखले देण्याबाबत स्पष्ट आदेश असताना ग्रामसेवक सामुदायिक पद्धतीने दाखले देण्यास नकार देत आहेत हा शिस्तभंग असल्याने तातडीने अशा ग्रामसेवकांना सेवेतून बडतर्फ करावे. बांधकाम मजुरांची अनेक योजना या नूतनीकरणावर अवलंबून आहेत व नूतनीकरण हे ग्रामसेवकांच्या दाखल्यावर अवलंबून असल्याने गरीब कामगार योजनांपासून वंचित राहत आहेत. या कामगारांना तातडीने दाखले देण्याची व्यवस्था करावी. ज्या बोगस बांधकाम कामगारांमुळे हा प्रश्न उद्भवला आहे त्या बनावट बांधकाम कामगारांना शोधून काढून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच एजंट वर फसवणुकीचा अदखलपात्र गुन्हा दाखल करावा.

उपोषण

या मागण्यांसाठी खऱ्या नोंदीत बांधकाम मजुरां करवी बेमुदत उपोषण पंचायत समिती नेवासा या ठिकाणी सुरू झाले आहे.यावेळी नेवासा तालुक्यातून प्रामुख्याने सर्वश्री लक्ष्मण मुरलीधर औटी, बाबासाहेब रावासाहेब दातीर, रंगनाथ डुकरे, नबाब शेख,शमीर पठाण, सावता रासकर ,बापू डोईफोडे, किशोर शिंदे, बंडू तांबे ,राहुल दातीर ,बापू तांबे ,गणेश जाधव,नंदू जाधव ,शिवाजी डफाळ, किरण डोईफोडे ,रवींद्र मकासरे, किरण शेरे ,मायकल मिरपगार ,संदीप मकासरे राहुल खोमणे, गणेश थोरे ,संजय खाटीक ,सोमनाथ खाटीक ,पप्पू वंजारे हे कामगार उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत.

newasa news online
उपोषण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपोषण
उपोषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपोषण