नेवासा – नगर ते छत्रपती संभाजी नगर रोडवर प्रवरा संगम पुलावर काल जे आंदोलन करण्यात आलं होतं आणि सांगितलं जात होतं की दोन आंदोलकांनी जलसमाधी घेतली आहे… ते दोन्हीही जण जिवंत अवस्थेत आढळून आले आहेत.. त्यामुळे वाहनधारकांना तसेच पोलिस तसेच प्रशासनाला ज्या प्रकारे वेठीस धरण्यात आलं होतं त्यामुळे आता पोलिस आणि प्रशासन काय कारवाई करतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत…
प्रवरा संगम पूलापासून खाली साधारण २ किलोमीटर अंतरावर हे आंदोलक मिळून आले आहेत.
आंदोलकांनी उडी मारली अशी माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी ही स्थानिक मच्छीमारांना सूचना देऊन अशी काही दुर्घटना दिसून आल्यास कळवण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे स्थानिक मच्छीमारांनी ही माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.