ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गडाख

नेवासा – आपल्याला उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद दिले परंतु मंत्रिपदाची हवा डोक्यात न जाऊ देता नेवासा तालुक्यामध्ये विकास कामे केली असे प्रतिपादन प्रवाससंगम येथे निर्धार मेळाव्या प्रसंगी आ.शंकरराव गडाख यांनी केले

या कार्यक्रम प्रसंगी मंचावरती आ.शंकरराव गडाख, मुळा सहकारी साखर कारखान्या व्हॉइस चेअरमन कडूबाळ पाटील कर्डिले, दादासाहेब शेळके, गोगलगावचे सरपंच दिलीपराव मते,योगेश मस्के, डॉ. अशोकराव ढगे, ह .भ .प दिनकर महाराज मते, काकासाहेब शिंदे, गफूर भाई भगवान, काशिनाथ नवले, तसेच बेलपिंपळगाव गटातील व सर्व नेवासा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निर्धार मेळाव्या प्रसंगी प्रवरासंगम येथील हिरा मंगल कार्यालय ते उपस्थित होते.

गडाख

या कार्यक्रम प्रसंगी आमदार गडाख म्हणाले की या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे तसेच बेलपिंपळगाव गटातील शेतकरी पाट पाण्यावर आधीरीत आहे या गटामध्ये पाट पाण्याचे नियोजन व्यवस्थित झाले नाही तर शेतकरी मोठ्या अडचणीत येतो ज्या वेळेस मी सरकार मध्ये होतो त्यावेळेस 80 कोटी रुपयांचे या गटासाठी सबस्टेशन मंजूर करून घेतले होते परंतु दुर्दैवाने सरकार गेल्यामुळे ते काम स्थगित करण्यात आले. हेच विजेचे काम झाले असते तर पुढची वीस-पंचवीस वर्षे नेवासा तालुक्याला तसेच बेलपिंपळगाव गटाला विजेचा प्रश्न भेडसावला नसता परंतु दुर्दैवाने हा आपला प्रस्ताव स्थगित करण्यात आला.

आ.गडाख पुढे बोलताना म्हणाले की मागील इलेक्शन झाल्यानंतर आपण उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला त्यावेळेस वाटले होते की भाजप शिवसेना युती होईल परंतु तसे काही झाले नाही तरीही आपल्याला त्यांनी मंत्रिपदाचा मान दिला त्या काळामध्ये आपण बरेचसे कामे केली परंतु त्या अडीच वर्षानंतर या भाजप सरकारने मंजूर झालेले कामे यांना करते सरकारने ठप्प केले सरकार गेल्यानंतर एकही काम आपल्याला त्यांनी दिलं नाही त्यांनी कोर्टातून कामे थांबवली होती तसेच कोर्टात जाऊन आपल्याला ती स्थगिती उठावावि लागली आपल्याला सरकार मध्ये उद्धव साहेबांनी मंत्रिपदाची संधी दिली परंतु आणखीन दोन वर्षे जरी सरकार राहिले असते जरी आपण तालुक्यामध्ये एकही काम शिल्लक ठेवले नसते.

गडाख

बरेच कार्यकर्ते व शेतकरी मला म्हणाले गोहाटीलाजा मी गोहाटीलाही जाऊ शकलो असतो परंतु माझ्या कपाळावरती जो डाग लागला असता तो कधीही पुसला गेला नसता त्यामुळे मी त्याच्यावरती थांबण्याचा निर्णय घेतला मी एकमेव अपक्ष आमदार असेल की महाविकास आघाडीमध्ये आहे माझ्यावरती अनेक प्रलोभने आले अनेक दबाव आले त्यात कारखाना असेल, सहकारी संस्था ,मुळा एज्युकेशन संस्था, सूतगिरणी असेल कुठलीही छोटी मोठी संस्था यांनी त्रास देण्या साठी सोडली नाही आणि तरीही मी पवार साहेब ,असतील राहुल गांधी ,असतील उद्धव ठाकरे असतील यांच्या सोबत राहिलो. महाराष्ट्र मध्ये लोकसभेला जनतेने व शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे.त्यासाठी आपल्याला येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुटून काम करायचं आहे तर ते आपल्याला कांदाभाव वाढीसाठी
पाटपाण्यासाठी,दुधाच्या भाववाढीसाठी कांद्याचेभाव वाढून -न देण्यासाठी दुसऱ्या देशातून कांदा आयात केला जाणार आहे.

महाविकास आघाडीच्या काळामध्ये कर्जमाफी उद्धव साहेबांनी केली होती पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी साठी लढा देऊ व कर्जमाफी पुन्हा सरकारला करण्यास भाग पाडू असे आश्वासन बोलताना शेतकऱ्यांना आमदार गडाख यांनी दिले.

ते तालुक्यातील राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना म्हणाले की तालुक्यातील विरोधकांची अशी परिस्थिती आहे एक ,दोन, तीन ,नवे चार चार जण आमदार व्हायला पाहत आहेत ते सर्व ज्याच्या त्याच्या परीने पळत आहेत ज्याला त्याला वाटतं मला आमदार व्हायचंय परंतु मलाही मोठेपणासाठी नाही तर या तालुक्यातील रस्ते ,वीज, पाणी ,शेतकरी ,कष्टकरी, बेरोजगार युवक , यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला आमदार व्हायचंय मला जे काय करायचे ते सांगणार व ज्यांचे प्रश्न आहेत ते पण ऐकून घेणार व ती मार्गी लावणार ते विरोधकावर बोलताना म्हणाले की यांनी आत्तापर्यंत काय केले तसेच यांच्या पक्षाने काय दिवे लावले हे माझ्याबद्दल वाईट बोलतील वाईट प्रचार करतील

गडाख

त्यांनी उपस्थितांना कार्यकर्त्यांना आव्हान केले की तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोला माझ्याशी चर्चा करा विरोधक हे तुमच्या मनामध्ये काहीतरी माझ्याबद्दल वेडे वाकडे भरून देतात तसेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार मोठे विकास कामे तालुक्यामध्ये करायचे आहेत मंत्रीपद मनात नसताना ही उद्धव साहेबांनी आपल्याला मंत्रिपतीचा मान दिला परंतु मि मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ न देता मी नेवासा तालुक्यामध्ये काम केले आहे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे आपल्याला मंत्रिपद भेटू अगर न भेटू उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले पाहिजे असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला शंकरराव गडाख हे प्रवरासंगम येथे कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळावा प्रसंगी बोलत होती.

तसेच या कार्यक्रमाचे अवचित्य साधून भाजपाला रामराम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आ.शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो युवक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कदम, सूत्रसंचालन बाळकृष्ण पवार, आभार राजेंद्र गुगळे, यांनी मानले तसेच या कार्यक्रम प्रसंगी शरीफ भाई पटेल, नवनाथ पठाडे, दिगंबर लोंढे ,राजेंद्र गलांडे ,नितीन लहारे ,गणेश पठारे, राजेंद्र साठे, तसेच नेवासा तालुका व विशेष करून पिंपळगाव गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने निर्धार मेळाव्या प्रसंगी उपस्थित होते.

गडाख
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख