श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथे सोमवार दिनांक 23 नेवासा-सप्टेंबर रोजी मुक्तसंचार गोठा व दुग्ध उत्पादन व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण संपन्न झाले . प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील यांनी आधुनिक दुग्ध व्यवसायाबरोबर गांडूळ खत निर्मिती उद्योगाला पूरक व्यवसाय म्हणून पहावे व त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत घ्यावी असे आवाहन प्रमाणपत्र वितरण प्रसंगी केले.
कृषी विज्ञान केंद्र स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने दिनांक 23 ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच भाग म्हणून केव्हिके दहिगाव येथे दिनांक १८ ते २२ सप्टेंबर मुक्तसंचार गोठा व दुग्ध उत्पादन व्यवस्थापन’ या विषयावर ग्रामीण युवक व युवती प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने यांच्या गत 12 वर्षांमधील उपलब्धतेबाबत व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली.
देशी गाई, शेळी व कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, नैसर्गिक शेती, जैविक खते बाबत माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री मिलिंद नाना कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव ने हे आता परिसराचे वैभव असल्याचे नमूद केले व ३० ते ३५ गायींच्या मुक्त गोठा संकल्पनेतिल मेहंनातीचे अनुभव कथन केले. यावेळी ग्रामीण युवक युवतींसाठी ‘मुक्तसंचार गोठा व दुग्ध उत्पादन व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण वर्गात सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडाचे संचालक श्री दादासाहेब गंडाळ, दहिगाव ने चे उपसरपंच श्री राजाभाऊ पाऊलबुद्धे, माजी सरपंच श्री सुभाष नाना पवार, रांजणी चे सरपंच श्री काकासाहेब घुले, कडूबाळ घुले हे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र कडील उपलब्ध सुविधा व तंत्रज्ञान एकाच ठिकाणी अवगत होण्याच्या दृष्टीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केव्हीके चे श्री नारायण निबे, श्री सचिन बडधे, डॉ. चंद्रशेखर गवळी, श्री प्रकाश हिंगे, श्री प्रकाश बहिरट, श्री प्रवीण देशमुख, श्री संजय थोटे, श्री अनिल धनवटे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन इंजिनियर राहुल पाटील यांनी केले श्री. माणिक लाखे यांनी आभार मानले
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.