ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिवस्वराज्य

नेवासा – आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केलेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा दि २७ रोजी गुरुवारी नगर येथे जात असताना नेवासे फाटा येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ताफ्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी कऱण्यात आली

यावेळी खासदार नीलेशजी लंके साहेब,खासदार अमोलजी कोल्हे , जिल्हा अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष केतन काळे नेवासे तालुका अध्यक्ष सतिष थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस तालुक्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

शिवस्वराज्य

यावेळी जयंत पाटील म्हणाले की नागरिकांच्या समस्या जाणून घेणे त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आलेली आहे या यात्रेच्या निमित्ताने जनतेचे प्रश्न पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवले जाणार असून युवाशक्तीला देशाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे

या प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अभिजीत ससाणे,नेवासे शहर अध्यक्ष इरफान शेख, युवक युवक तालुका अध्यक्ष संदीप कूसळकर, अनिल नाबदे, चंदू पवार संतोष, साजिद पठाण, योगेश पाटील, रवी गव्हाणे,सागर महापूर, कल्पेश गायके, याच्या सह राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवस्वराज्य
newasa news online
शिवस्वराज्य

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवस्वराज्य
शिवस्वराज्य

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवस्वराज्य