ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

नेवासा – सोशल मीडियामध्ये पोलिसांच्या बदनामी प्रकरणी नेवासा बुद्रुकचा सराईत गुन्हेगार माऊली तोडमल याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एका पोलिसाच्या वसुली कृत्यामुळे व्यावसायिक त्रस्त; अँटीकरप्शन होण्याची शक्यता’ अशा आशयाचा मजकूर व्हॉट्सअॅप तसेच फेसबुक सोशल मीडियात पोस्ट करून पोलिसांची बदनामी केली. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षकांनी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

गुन्हा

माऊली तोडमलवर हयगईने जीव घेणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, दंगा, दरोडा, आत्महत्येचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांचे हुकूम मोडणे यासारखे संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.
३ जून २०२४ रोजी स्वतःवर देशी कट्टयामधून हल्ला झाला म्हणून माऊली तोडमल यांनी पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान संशयित आरोपी व फिर्यादी माऊली तोडमल यांचेच हँडवॉश पोलिसांनी घेऊन तपासणीसाठी पाठवले होते याचा राग मनात धरून मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या विरोधात जनतेमध्ये अपप्रचार करणे,पोलिसांची बदनामी होईल
अशा प्रकारची वक्तव्ये करणे व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची भीती घालणे यासारखे वर्तन करीत आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरची बाब नेवासा पोलीस मा. न्यायालयास कळवून पुढील तपास करणार आहेत. माऊली तोडमल याच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव स्वतः करणार आहेत.

गुन्हा
newasa news online
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा