गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात येथील सभागृहात पार पडली. सोसायटीचे चेअरमन डॉ. अक्षय लोहकरे यांचे अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. राजेंद्र लोहकरे सर यांनी संस्थेचे अहवाल वाचन केले. सभेमध्ये मागील वार्षिक सभेचे प्रोसेडींग वाचुन मंजूर करणे, सन २०२३-२४ ची हिशोबाची पत्रके, नफा तोटा, ताळेबंद पत्रक वाचुन मंजूर करणे. झालेल्या खर्चास मान्यता देणे, पीक कर्ज प्रकरणे तयार करण्याचा अधिकार मंडळास देणे,उत्पन्न खर्चाचे अंदाज पत्रकास मंजुरी देणे, संस्थेचे सभासद व पंचकमेटी सदस्य थकबाकीदार सभासदांचे थकबाकी वसुली बाबत विचार विनिमय करणे, त्याचबरोबर संचालक मंडळांना प्रशिक्षण देणे बाबत सह अनेक विषयांवर चर्चा विनिमय करत ही सभा पार पाडली.
संस्था चालविण्यासाठी व जिवंत ठेवण्यासाठी सर्व सभासदांनी संस्थेमार्फत मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर शेती साठी लागणारे कर्ज घेऊन ते वेळेवर भरणा केला तर संस्थेत आपले क्रेडिट निर्माण होते. पर्यायाने संस्था ही नफ्यात येथे. आज रोजी बरेचदा सेवा संस्था या डबघाईस गेल्या आहेत . त्या मानाने आपली कामधेनू अजून जिवंत असल्याचे डॉ. अक्षय लोहकरे यांनी बोलताना सांगितले. यावेळी. संस्थेचे मार्गदर्शक दत्तात्रय लोहकरे, क्रुष्णा तांदळे, व्हा. चेअरमन रामकिसन पालवे, दिलीप इथापे, सुधीर लोहकरे, रमेश बेल्हेकर, संजय दरंदले, जालींधर दरंदले, मच्छिंद्र शिरसाठ, शोभा संजय लोहकरे, शहाबाई किसन बेल्हेकर, महादेव गडाख,रावसाहेब वैरागर, गोरक्षनाथ डौले,क्लार्क देविदास आठरे, देविदास गडाख, भाऊराव गडाख,सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.