गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे रेशन मध्ये मोठा सावळा गोंधळ सुरू आहे. दर महिन्याला धान्यांची वाटप होणे गरजेचे असताना मात्र संबंधित दुकानदार आपल्या मनाला वाटेल तेव्हा म्हणजे महिन्याच्या शेवटी एक किंवा दोन दिवसच त्याची वाटप करतो.नंतर महीना संपला त्यामुळे आता मशीनवर मागील धान्याचा कोठा दिसत नसल्याचे कारण पुढे करत लाभार्थीना ते देण्यास नकार संबंधित दुकानदार देत असल्याचे समोर आले आहे. जर लाभार्थीचे मागील महिन्यातील शिल्लक धान्य चालू कोट्यातून देणे बंधनकारक असताना तेही मिळत नाही.
रेशनकार्ड मधील मयत व्यक्तींचे शिल्लक धान्य कुठे जाते. गणेश चतुर्थी चा आलेला आनंदाचा शिधा दुकान मध्ये अस्ताव्यस्त धुळखात पडलेला असताना देखील त्याचे वाटप दुकानदाराकडुन होत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. वाटप करत असताना गोरगरिबांच्या धान्याची नासाडी देखील या वेळी मोठ्या प्रमाणात होते. तरी देखील वरिष्ठांनी संबंधित दुकानदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी रेशन धारकांना केली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.