तथापि पवित्र अशा गोवंशावर मध्यंतरीच्या कालखंडात गंडांतर आलेले असतांना देशातील विविध भागात देशी गायीचे जतन करण्यासाठी अनेक साधू-संत-गोरक्षक तन- मन- धनाने प्रयत्न करत आलेले आहेत. तथापि राजाश्रय नसल्यामुळे त्यांना सातत्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शासनाकडून गो- मातेच्या रक्षण व संवर्धनासाठी काही ठोस निर्णय व्हावा यासाठी वारकरी संप्रदाय व गो- सेवक सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत होते
देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषीत करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय तसेच समस्त मंत्रीमंडळाचे श्री क्षेत्र देवगड येथील गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी म्हटले आहे की अखंड भारतवर्षात पुरातन काळापासून देशी गायीस मातेचे स्थान दिलेले आहे. देशी गाय धार्मिक-वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची असून धर्मशास्त्रात तिला ‘कामधेनू’ म्हणून संबोधलेले आहे. तमाम वारकरी संप्रदाय व गो-रक्षकांच्या प्रयत्नांना आज यश आले असून देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषीत करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाने समस्त वारकरी संप्रदाय व गो-सेवकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असून या ऐतिहासिक निर्णयाबद्दल समस्त वारकरी संप्रदाय तसेच श्री क्षेत्र देवगड भक्तपरिवारातर्फे मा. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री महोदय व समस्त मंत्रीमंडळाचे हार्दिक अभिनंदन करत असून या पुढेही आपल्या मंत्रीमंडळाकडून अशाच प्रकारचे देशहित व समाजहितकारक निर्णय घेतले जावेत अशी अपेक्षा गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी व्यक्त केली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.