ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गडाख

नेवासा फाटा – नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर शिवारात चारी क्रमांक तीन जवळ असलेल्या रामनगर येथील गुरुवर्य महंत सुनीलगिरी महाराज यांच्या श्रीराम साधना आश्रमातील सभामंडपाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते उदघाटन करून सदरचा सभामंडपाचे भाविकांच्या सेवेसाठी लोकार्पण करण्यात आले. आमदार गडाख यांनी सभामंडपाच्या कामासाठी निधीची तरतूद केली होती. आपल्या सर्वांच्या पाठबळावर पुढील काळात अधिक जोमाने विकासकामे करू, धार्मिक कार्यात केलेल्या कामांमुळे आत्मिक बळ मिळते असे प्रतिपादन आ. शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी झालेल्या सभामंडप उदघाटन कार्यक्रम प्रसंगी प्रगतशील शेतकरी काकासाहेब शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. महंत सुनीलगिरी महाराज, नेवासा मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील, सीताराम निपुंगे, रावसाहेब कांगुणे, तुकाराम मिसाळ, भिवाजी आघाव, भरत काळे, अशोक उपळकर, सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ, भक्त परिवारातील सदस्य उद्योजक सुरेशराव उभेदळ, वैभव निकम, पी.आर.जाधव, कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब रेपाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

गडाख

यावेळी बोलतांना श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज यांनी आमदार शंकरराव गडाख यांचे धर्म कार्यासाठी मोठा हातभार लावला असून लहान मोठे असे १२० सभामंडप त्यांनी तालुक्यात बांधले, जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून ते कार्य करत आहेत, शक्तीने राज्य आणि युक्तीने कार्य जेथे होते तेथे राजपद हे निश्चित असते. आमदार गडाख साहेबांच्या चांगल्या कार्याबद्दल पुढे देखील त्यांच्याकडून चांगली कामे होत राहतील असा शुभाशीर्वाद देऊन त्यांनी सभामंडप दिल्याबद्दल आ.गडाख यांना धन्यवाद दिले.

यावेळी बोलतांना आ.शंकरराव गडाख म्हणाले की, श्रीराम साधना आश्रमाच्या माध्यमातून महंत सुनीलगिरी महाराज यांचे सुरू असलेले धर्म कार्य कौतुकास्पद आहे, सभामंडपाचे काम दर्जेदार असे झाले असून येथे होणाऱ्या धार्मिक कार्यासाठी त्याचा उपयोग होईल, धार्मिक कार्यासाठी केलेल्या कामांमुळे आत्मिक बळ मला मिळते असे स्पष्ठ करून ते म्हणाले की, सरकार गेल्यानंतरही सुमारे १३० सभामंडप तालुक्यातील मंदिरांना दिले, सत्ता नसतांना काम करणे अवघड असते, तरी पण मार्ग काढून हे सभामंडप देण्याचा प्रयत्न केला आहे. चांगलं काम तालुक्यात सुरू आहे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने पुढील काळात अधिक वेगाने काम करण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.

गडाख

याप्रसंगी श्रीराम साधना आश्रम व भक्त परिवाराच्या वतीने आ.गडाख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे, चंद्रकांत कामटे, दत्तात्रय कांगुणे, संजय जंगले, मुन्ना चक्रनारायण, प्रविण साळवे, भाऊसाहेब जाधव, संजय काकडे, बाळासाहेब बर्डे, संजय गायकवाड, भीमाशंकर वरखडे, परवेझ पठाण, बाळासाहेब झावरे, माणिक भागवत, भाकचंद पाडळे, विठ्ठल पाषाण, दत्तात्रय घोलप, बाबासाहेब आल्हाट, पोपट निपुंगे यांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईन्नूस पठाण यांनी सूत्रसंचालन केले तर संतसेवक वैभव निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

newasa news online
गडाख
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख