नेवासा – नेवाशाचे नामांतर ज्ञानेश्वरनगर न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ. करणसिंह घुले यांनी दिलेला आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आदींनी या बाबत निवेदनाच्या प्रति देण्यात आलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे पैस खांबा टेकून ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. ही ज्ञानेश्वरी सच्चिदानंद महाराज यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे नेवासा शहराचे नामांतरण होणे गरजेचे आहे. राज्यातील औरंगाबादचे संभाजीनगर आता अहमदनगरचे अहिल्यानगर झालेले आहेत. आता नेवासा शहराचेही ज्ञानेश्वरनगर असे नामांतरण होणे गरजेचे आहे. नेवाशाचे ज्ञानेश्वरनगर नामांतरण व्हावे, अशी वारकरी संप्रदायाबरोबरच नागरिकांची मागणी आहे.
याबाबत अनेकांनी सरकारदरबारी पाठपुरावा केलेला आहे. मात्र त्याकडे सरकारने कानाडोळा केलेला आहे. नेवाशाचे ज्ञानेश्वरनगर नामांतरण करण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा घुले यांनी निवेदनात दिलेल आहे. नेवासा शहाराचे नामांतरण व्हावे, ही सर्वच पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्याबरोबर वारकरी संप्रदायातूनही ही मागणी पुढे येत आहे. त्यामुळे नामांतराच्या मुद्दयासाठी सर्वच पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांना एकत्र करून नामांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. यासाठी लकरच शहरात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे.
या समितीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात नेवाशाचे संत ज्ञानेश्वरनगर नामांतरण करण्यात यावे, असा ठराव करून तो शासनाला पाठविण्याबाबत काम करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच हा निर्णय व्हावा, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. शासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास गावा-गावात जनजागृती करून विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा डॉ.घुले पाटील यांनी दिला आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.