ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Paytm

Paytm Payment Bank : पेटीएमला Fastag देण्यास बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच आता पेटीएम (Paytm Payment Bank )युजर्ससाठी नवीन Fastag जारी करू शकणार नाही.NHAIच्या वतीने टोलशी संबंधित सर्व बाबींमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार IHMCLला देण्यात आले आहेत.

Paytm Payment Bank : Indian Highways Management Company (IHMCL) भारतातील टोलशी संबंधित बाबींवर लक्ष ठेवते. सामान्यत: पेटीएम (Fastag) पेमेंटबँकेच्या मदतीने युजर्सला फास्टॅग मिळत असे. पण आता पेटीएमला हे देण्यास बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच आता पेटीएम युजर्ससाठी नवीन Fastag जारी करू शकणार नाही.NHAIच्या वतीने टोलशी संबंधित सर्व बाबींमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार IHMCLला देण्यात आले आहेत.

पेटीएम पेमेंट्स बँकेने(Paytm Payment Bank) सर्व्हिस लेव्हल अॅग्रीमेंटसाठी (एसएलए) घालून दिलेले निकष आणि नियम पाळले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता अशा परिस्थितीत पेटीएम कोणत्याही नवीन टोलसाठी नवीन फास्टॅग जारी करू शकणार नाही. पेटीएम पेमेंट बँकेकडून एनएच नेटवर्क अंतर्गत कोणत्याही टोल प्लाझावर फास्टॅग जारी केला जाऊ शकत नाही. IHMCLच्या वतीने पेटीएमला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. फास्टॅगसंदर्भात अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी फास्टॅग केवायसीसंदर्भात सरकारकडून निर्णय घेण्यात आला होता.

Paytm

प्रत्यक्षात एक वाहन, एक फास्टॅग सरकारकडून सातत्याने काम केले जात आहे. भारतात लागू करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंट सिस्टीममध्ये ट्रान्स्फरंसी आणण्याच्या उद्देशाने सरकारने ही कारवाई केली. यापूर्वी अनेक फास्टॅग जारी करण्यात आले होते. पण आता सरकार आधी जारी करण्यात आलेले असे सर्व फास्टॅग बंद करणार आहे. 31 जानेवारीपासून या कारवाईला सुरुवात होणार आहे. 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक अपडेट जारी केला आहे. 31 जानेवारीनंतर केवायसी (KYC – Know your Customer) ने केलेले किंवा अपूर्ण केवायसी झालेले फास्टॅग बंद करण्यात येतील. NHAI कडून जारी करण्यात आलेल्या नव्या अपडेटनुसार, 31 जानेवारी पूर्वी फास्टॅगचे केवायसी (KYC) करणे आवश्यक आहे, अशी घोषणा NHAI ने केली आहे. केवायसी (KYC) न केल्यास 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टॅग बंद होईल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना तुम्हाला टोल भरण्यात अडचण येईल आणि प्रवास करतानाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे 31 जानेवारी पूर्वी फास्टॅग केवायसी करून घ्या.

Paytm

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Paytm
Paytm

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Paytm
Share the Post:
error: Content is protected !!