ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Political News

Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत(NCP) दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेलाय. याबाबतच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. (Political News )

Political News : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या(politics) पार्श्वभूमीवर दिल्लीत आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेलाय. याबाबतच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

यावेळी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पहिल्यांदा युक्तिवादाला सुरुवात केली. त्यांनी कोर्टाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. या मागण्या सुप्रीम कोर्टाने मान्य करत निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत. तसेच अजित पवार गटाला उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांना उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यांनंतर होईल, असंही कोर्टानकडून स्पष्ट करण्यात आलं.(political issues)

पुढील आदेशापर्यंत ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ हे पक्षाचं नाव कायम ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. येत्या आठवडाभरात शरद पवार गटाला नवं निवडणूक चिन्ह द्यावं, असे आदेशही सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी आगामी निवडणुकीपर्यंत पक्षाचं नाव कायम ठेवावं, अशी मागणी शरद पवार गटातर्फे करण्यात आली. ही विनंती कोर्टानं मान्य केली.


केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष(NCP) आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी आगामी निवडणुकीपर्यंत पक्षाचं नवं नाव कायम ठेवावं, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. ही विनंती कोर्टानं मान्य केली आहे. वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.(politics)

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून आजच्या सुनावणीत युक्तिवादावेळी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. “मराठा आरक्षणासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन होतंय. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला पक्षाचा प्रचार करण्यासाठी, पत्रकांची छपाई करावी लागणार आहे.(Political news) त्यानुसार आम्हाला तात्पुरत्या पक्षाचे नाव, चिन्ह कायम देण्यात यावं”, अशी मागणी सिंघवी यांनी कोर्टात केली. “अजित पवार यांच्या गटाचा व्हीप शरद पवार यांच्या गटाला लागू होत नाही. आमची कोर्टाला विनंती आहे की नाव आणि पक्षाचे चिन्ह पुन्हा कायम स्वरुपासाठी देण्यात यावं”, अशी मागणी सिंघवी यांनी कोर्टात केली.

न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी यावेळी अजित पवार गटाला काही प्रश्न विचारले. न्यायमूर्ती अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांना उद्देशून म्हणाले. “मुकुल रोहतगी तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या (आयोगाच्या) आदेशात काय लिहिलंय? दोन्ही गटांनी घटना पाळली नाही. कोणीही अपात्र ठरलं नाही. split वगळून merger ची तरतूद करण्यात आली. त्याचा उद्देश काय होता? पण यामध्ये मतदाराचे काय?”, असे सवाल कोर्टाने केले आहेत. याबाबत अजित पवार गटाला पुढील दोन आठवड्यात उत्तर द्यावं लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यानंतर होईल, असं कोर्टाने स्पष्ट केलं.(Political news)

Political News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Political News
Political News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Political News
Share the Post:
error: Content is protected !!