ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Political News

Political News : बारामतीत यंदा पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहेत. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून एकमेकींच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. (Political News)

Political News : बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. बारामतीत पहिल्यांदा पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांच्याविरोधात उभ्या ठाकणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. सुनेत्रा यांचं तिकीट जाहीर झालं नाही. पण त्यांनी बारामतीचा दौरा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बारामतीतील राजकीय हवाच बदलली आहे. या सर्व राजकीय घडामोडींवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य लढतीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाहीत निवडणुकीला उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी अधिकार गाजवत असेल तर तक्रार करण्याची गरज नाही. आपली भूमिका लोकांसमोर मांडावी, आपण काय काम केलं हे सांगितलं पाहिजे. अनेक संस्था आम्ही उभ्या केल्या. 50 वर्षापासूनच्या या संस्था आहेत. आम्ही ज्या काळात या संस्था स्थापन केल्या, त्यावेळी आज आरोप करणाऱ्यांचं काय वय होतं याचं त्यांनी कॅलक्युलेशन करावं. त्याचा विचार करावा. तुम्ही जरूर उभं राहा. तो तुमचा अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले.(Political News)

यावेळी शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांनाही झापलं. धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीत जेवढा कालखंड गेलाय त्याच्या किती तरी वर्षापासून जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीत काम करत आहेत. आव्हाडांनी राज्यच नाही तर देशपातळीवरही काम केलंय. आमदार आणि मंत्री राहिले आहेत. त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे. त्यामुळे आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आव्हाडांनी काय बोलावं याचं मार्गदर्शन करण्याची अन्य लोकांची गरज नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

Political News

यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला केला. साधी सरळ गोष्ट आहे. भाजपचं संसदेत बहुमत आहे. सरकारने विरोधी पक्षाशी चर्चा करावी. धनगर, मुस्लिम आणि लिंगायतांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारने आणला तर त्याला विरोधक सहकार्य करतील. असं असताना वेगळी भूमिका कोर्टात मांडणं म्हणजे या घटकांना आरक्षण न देण्याचं धोरण आहे. त्यामुळेच या वर्गावर अन्याय करणारा निकाल लागला आहे, असं शरद पवार म्हणाले.

Political News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Political News
Political News
Political News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Political News
Share the Post:
error: Content is protected !!