ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime

Pune Crime News : अभिनेते रमेश परदेसी (Ramesh Pardesi) यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन महाविद्यालयीन तरुणी नशेत असल्याचं दिसत आहे.

Pune Crime News :  पुणे पोलिसांनी एकीकडे देशातील सगळ्यात (Pune Drugs) मोठ्या ड्रग्स रॅकेटचा खुलासा केला आहे तर दुसरीकडे महाविद्यालयीत विद्यार्थी या ड्रग्सच्या नशेत टुल्ल दिसत आहे.  शिक्षणाचं माहेर घर  असलेल्या पुण्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या आहारी गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यातच  पुण्यातील तरुणींना ड्रग्स घेतलेला भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवरचा हा व्हिडीओ आहे. अभिनेते रमेश परदेसी (Ramesh Pardesi) यांनी हा व्हिडीओ समोर आणला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन महाविद्यालयीन तरुणी नशेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी पुण्यात आलेली तरुणाई नेमकी कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.(pune crime news)

दोन तरुणी ड्रग्सच्या आहारी गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तर दुसरी मुलगी ड्रग्स प्राषण केल्याने नशेत बडबडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत रमेश परदेसी म्हणातात की, वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. तर इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही इथं सेफ जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी 4 हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे. 

याच व्हिडीओत बोलताना ते म्हणतात की,  शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघरं होतंय का? याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा. पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी येतात तिथं ही तरुण मुलं मुली अशा प्रकारे नशा करतात. आपल्या आई-वडिलांना माहिती नसतं की मुलं नक्की काय करतात बाहेर.

या व्हिडीओत बोलताना त्यांनी पालकांवरदेखील काही प्रमाणात आरोप केले आहे. शिवाय हे प्रकरणं गांभीर्यानं घेण्याचं आवाहनही त्यांनी पालकांना केलं आहे. आपण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडं गांभीर्यानं बघणार आहोत की नाही. पुण्यात 4 हजार कोटी ड्रग्ज सापडलं पण पुणेकरांनी यावर साधी एक प्रतिक्रिया दिलेली नाही. (pune crime)मागे ललीत पाटील सापडला आणि आता हे. त्याचा केवळ राजकारणासाठीच वापर झाला. पण यामुळं तरुण पिढी बरबाद होत आहे याचा आपण गांभीर्यानं विचार करणार आहोत का नाही? जर आत्ताच काही केलं नाहीतर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

या व्हिडीओमध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तर दुसरी मुलगी ड्रग्स घेऊन नशेत बडबड करताना दिसत आहे. अभिनेते रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकला आहे. ते म्हणतात, आम्ही वेताळ टेकडीवर पळायला आलो होतो. तर येथे महाविद्यालयात असणाऱ्या पहिल्या वर्षातील दोन तरुणी बिअर, दारु आणि नशेचे काहीतरी घेऊन कोपऱ्यात पडल्या होत्या. काही तरुणांनी त्यांना उचलून आणले. आम्ही त्यांना रुग्णालयात नेत आहोत. परंतु एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही? असा रोखठोक प्रश्न रमेश परदेशी यांनी विचारला आहे.

Crime

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime
Crime

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime
Share the Post:
error: Content is protected !!