ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime

Pune Drugs Racket : पुणे आंतराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कुरकुंभ येथील  (Pune Drugs)  निर्मित ड्रग्स आधी दिल्ली आणि त्यानंतर लंडनमध्ये पाठवण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

पुणे आंतराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट   (Pune Crime News) समोर आली आहे. कुरकुंभ येथील  (Pune Drugs)  निर्मित ड्रग्स आधी दिल्ली आणि त्यानंतर लंडनमध्ये पाठवण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे हे ड्रग्ज (Pune Drug Racket Bust) विमानाने फुड डिलिव्हरी सर्व्हिसच्या मार्फत पाठवण्यात आलं होतं. दिल्लीतून तब्बल 140 किलो एम डी ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी करण्यात आली होती. या ड्रग्जची किंमत साधारण 280 कोटी रुपये आहे. 

पुण्यात देशातील सगळ्यात मोठं ड्रग्ज रॅकेट समोर आलं. त्यात 4000 कोटी रुपयांचं ड्रग्स पुणे पोलिसांनी विविध ठिकाणाहून जप्त केलं. हे ड्रग्ज पुणे जिल्ह्यातील कुलकुंभमध्ये असलेल्या कारखान्यात तयार करण्यात येत होतं. तिथून हे ड्रग्ज देशातील विविध भागात आणि विदेशात पुरवण्यात येत असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता हे ड्रग्स फूड कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून पाठवले जात होते.

दिल्लीतील 2 जणं अधिकृत फूड कुरिअरचां व्यवसाय करत होता. याच्या माध्यमातून हे पार्सल पाठवलं जात होतं. आत्तापर्यंत दिल्लीतून पुणे पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. दिवेश भुटीया,संदीप कुमार, संदीप यादव या 3 जणांवर ड्रग्स लंडनला पाठवण्याची जबाबदारी होती. आतापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

पुणे पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उघड केलं आहे. त्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या ड्रग्स रॅकेटचा म्होरक्या सनी उर्फ संदीप धुनिया याचा देखील फोटो पुणे पोलिसांच्या हाती लागलेला आहे.  संदीप धुनिया याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात आता इंटरपोलची मदत घेतली जाणार आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय 40, खडीचे मैदान, सोमवार पेठ),  अजय अमरनाथ करोसीया (वय 35, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय 40, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय 46, रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (वय 41, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबीवली पश्चिम, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्ली येथून दिवेश भुतीया (वय 39) आणि संदीप कुमार (वय 42 , दोघेही रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर आयुब अकबर मकानदार याला सांगलीतून अटक करण्यात आली आहे.  

Drugs

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Drugs
Drugs

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Drugs
Share the Post:
error: Content is protected !!