ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Rajya Sabha Election 2024

Rajya Sabha Election 2024 : चंद्रकांत हांडोरे आगामी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराष्ट्रातून उमेदवार असतील. काँग्रेसनं यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे.

Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्र काँग्रेसकडून (Maharashtra Congress) चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore)यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. काँग्रेसकडून राज्यसभा (Rajya Sabha Elections 2024) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत चंद्रकांत हांडोरे यांचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, चंद्रकांत हांडोरे यांचा गेल्या राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला होता. याच मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती. अशातच आता पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत हांडोरेंवर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. 

चंद्रकांत हांडोरे आगामी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराष्ट्रातून उमेदवार असतील. काँग्रेसनं यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे. याचाच अर्थ स्पष्ट होतंय की, आता भाजप आणि  मित्रपक्षांकडून यंदा महाराष्ट्रासाठी पाच उमेदवार दिले जाऊ शकतात. म्हणजे, काँग्रेसनं भाजप आणि मित्रपक्षांचे पाचही उमेदवार निवडून येतील, हे कुठे ना कुठे मान्य केलं आहे, असं स्पष्ट होत आहे. 

काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्या राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून राज्यसभेची यादी जाहीर करण्यात आली आहे. सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. याव्यतिरिक्त बिहारमधून अखिलेशप्रताप सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. यासोबतच काँग्रेस महाराष्ट्रात विधानसभेची एकच जागा लढवणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. 

पहा कोणा-कोणाला मिळाली उमेदवारी? 

  • काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी : राजस्थान 
  • अखिलेश सिंह : बिहार 
  • अभिषेक मनू सिंघवी : हिमाचल प्रदेश 
  • चंद्रकांत हांडोरे : महाराष्ट्र 

दरम्यान, 2022 मध्ये महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या होत्या. त्यावेळी चंद्रकांत हांडोरे पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती. महाविकास आघाडी राज्यसभेसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न करेल, असं बोललं जात होतं. पण, आता जे दिसतंय त्यानुसार, काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला असून चंद्रकांत हांडोरेंना उमेदवारी जाहीर केली आहे.

तसेच, असं असलं तरी अद्याप भाजपनं मात्र, अद्याप राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये चंद्रकांत हांडोरेंचा पराभव झाला होता आणि त्यावेळी भाजपनं जी रणनिती आखली होती, त्याप्रकारची रणनिती राज्यसभेसाठीही आखली जाऊ शकते का? तसेच, राज्यसभेसाठी भाजप महाराष्ट्रात पाच उमेदवार देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Rajya Sabha Election
Rajya Sabha Election

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Rajya Sabha Election
Rajya Sabha Election

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Rajya Sabha Election
Share the Post:
error: Content is protected !!