ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
santosh deshmukh

Santosh Deshmukh Case : बीड येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. याप्रकरणातील तीन आरोपी अजून फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. याप्रकरणात गंभीर आरोपही केले गेले. बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. अजूनही संतोष देशमुख हत्येप्रकरणातील तीन आरोपी मोकाट आहेत. पोलिस त्यांच्या शोधात आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. सातत्याने कराडच्या अटकेची मागणी केली गेली.

Santosh Deshmukh

मंगळवारी 22 दिवसांपासून फरार असलेला कराड सीआयडीच्या कार्यालयात दाखल होत शरण आला. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड आहे. पुण्यातून बीडमध्ये आणून केज न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रात्री केज कोर्टाबाहेर मोठा ड्रामा देखील बघायला मिळाला.

Santosh Deshmukh

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार तीन आरोपींना तात्काळ अटक करा, ही प्रमुख मागणी घेऊन बीडच्या मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे हे आंदोलन सुरू केले. हेच नाहीतर याप्रकरणातील आरोपींनी अटक करून तात्काळ फाशी द्यावी, अशीही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Santosh Deshmukh

बीडच्या संतोष देशमुख हत्येनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष हे बीडकडे लागले आहे. तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. अंजली दमानिया यांनी फरार तीन आरोपींबद्दल मोठा दावा केला होता. मात्र, त्याबद्दल अजूनही काही पुरावे हे मिळाले नाहीत. आरोपी कोणीही असो कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच स्पष्ट केले. यासोबतच माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले की, संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.

Santosh Deshmukh

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Santosh Deshmukh


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!