ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte ही मालिका बंद करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून बरीच जोर धरु लागली होती. त्यातच आता ही मालिका का बंद करत नाही, यावर चॅनलचे हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी स्पष्ट कारण सांगितलं आहे.

Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा नवा प्रोमो आल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर बरीच नाराजी व्यक्त केली. ही मालिका पुन्हा एकदा एक नवं वळण घेणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या या नव्या कथेवर प्रेक्षकांचा बराच संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ही मालिका बंद करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून बरीच जोर धरु लागली होती. त्यातच आता ही मालिका का बंद करत नाही, यावर चॅनलचे हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी स्पष्ट कारण सांगितलं आहे.  आई कुठे काय करते या मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरु होणार आहे.

आशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरलं जातंय. त्यामुळे पुन्हा एकदा अरुंधतीच्या आयुष्यात नवं वादळ उभं ठाकणार आहे. मालिकेच्या या नव्या वळणाला प्रेक्षकांनी बराच आक्षेप घेतलाय. त्यावर सतीश राजवाडे यांनी म्हटलं की, हे तेच प्रेक्षक आहेत, ज्यांनी Aai Kuthe Kay Karte मालिका सुपरहिट केली.  मालिका बंद न होण्यावर बोलताना सतीश राजवाडे यांनी म्हटलं की,  आई कुठे काय करते मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षक बरंच काही बोलले आहेत. पण तो त्यांचा हक्क आहे.

आम्ही त्यांना तो हक्क देतोय. कारण आज तेच रसिक प्रेक्षक आहेत, ज्यांनी ही मालिका सुपरहिट केली. त्यामुळे जर ते मालिका सुपरहिट करु शकतात तर मालिकेला बोलूही शकतात. पण त्याचसोबत मला खात्री आहे, ज्या वळणावर ही मालिका आम्ही घेऊन जाणार आहोत, ते लोकांना नक्की आवडेल.  आज ज्या प्रेक्षकांनी या मालिकेला नावं ठेवली आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मालिका प्रगल्भ करण्यासाठी आम्हाला हे वळण गरजेचं होतं. आपल्याला आई असते, पण आईला जेव्हा आईची गरज असते तेव्हा कोण असतं.

आपल्या सगळ्यांना गरज असते तेव्हा आई असते, पण आईला जेव्हा कोणाची गरज असते तेव्हा कोणीच नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही जे करतोय ते तुम्ही हा प्रवास पाहून झाल्यानंतर सांगा बरोबर आहे की चूक आहे ते, असं सतीश राजवाडे यांनी म्हटलं.(Aai Kuthe Kay Karte)

Aai Kuthe Kay Karte

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Aai Kuthe Kay Karte
Share the Post:
error: Content is protected !!