ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Shivjayanti

सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठिक ८:३० वाजता ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव शाळेत मोठ्या उत्साहात शिवजयंती(Shivjayanti) साजरी केली.

घोडेगाव – सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठिक ८:३० वाजता ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव शाळेत मोठ्या उत्साहात शिवजयंती(Shivjayanti) साजरी केली. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या माहितीवर विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण केले. यामुळे शाळेमध्ये शिवमय वातावरण निर्माण झाल्याने चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. श्री. राशिनकर सर यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आरती घेण्यात आली. यावेळी उपस्थित शाळेच्या प्रिन्सिपल सिस्टर क्विनीटा डिसोझा, सेक्रेटरी सिस्टर निलमनी, सिस्टर रफिला, सिस्टर लीना, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी होते.

विद्यार्थ्यांनी शिवरायांबद्दल उत्कर्ष राठोड व अंजली चव्हाण यांनी भाषणे केली तर नववीच्या मुलामुलींनी शिवरायांच्या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. आदित्य दहातोंडे याने शिवाजी महाराज यांची व आदिती कदम हिने जिजाबाई यांची वेषभूषा केली होती. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी गीत गायन करून शिवजयंती(Shivjayanti) उत्सवात सहभाग घेतला. शिवजयंतीसाठी प्रिन्सिपल सि. क्विनीटा, सांस्कृतिक कमिटीचे प्रमुख श्री बारगळ सर व खरात मॅडम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यजित व पूर्वा होंडे यांनी केले व शेवटी आभार प्रिन्सिपल सिस्टर क्विनीटा यांनी मानले.

newasa news online
Shivjayanti

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Shivjayanti
Shivjayanti

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Shivjayanti
Share the Post:
error: Content is protected !!