ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

sambhaji nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : मराठवाड्यात मोठी ताकद असूनही तुलनेने शिंदे यांच्या शिवसेनेला कमी जागा मिळणार आहेत.

Chhatrapati Sambhaji Nagar : महाविकास आघाडीप्रमाणेच (Maha Viksa Aghadi) महायुतीमध्येही (Mahayuti) जागावाटपाचे गुऱ्हाळ चालूच आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांत अनेक जागांवरून वाद सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) जागेवरही अद्याप ठोस तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान, मराठवाड्यात मोठी ताकद असूनही एकनाथ शिंदेयांच्या शिवसेनेला (Eknath Shinde Shivsena) येथे फारशा जागा मिळण्याची शक्यता नाही. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरची जागादेखील भाजपकडेच (BJP) राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत. मात्र या आठपैकी साधारण सहा जागांवर भाजपाचे उमेवार असतील. म्हणजेच ताकद असूनही शिंदे यांच्या शिवसेनेला येथे कमी जागा मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह यांनी संभाजीनरात येऊन मोठी सभा घेतली होती. म्हणजेच अमित शाहांच्या सभेच्या रुपात भाजपने येथे चांगले शक्तीप्रदर्शन करत या जागेवर दावा सांगायला चालू केले होते. आता या जागेसाठी भाजपकडून शिंदे यांच्या शिवसेनेवर दबाव टाकला जात आहे. आम्ही केलेल्या सर्वेक्षणात ही जागा आमच्यासाठी अनुकूल आहे, असे भाजपकडून सांगितले जातेय. 

भाजपने याआधीच बीड, जालना, नांदेड, लातूर या जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. म्हणजेच मराठवाड्यातील आठ पैकी चार जागांवर तर भाजपचे उमेदवार असणार हे स्पष्ट झालेले आहे. उर्वरित हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) या जागांसाठीही भाजपकडून जोर लावला जातोय. हिंगोली जिल्ह्यात सध्या शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे शिवसेना ही जागा सोडायला तयार नाही. धाराशिव आणि परभणी या जागादेखील आम्हालाच मिळाव्यात अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे हिंगोली, धाराशीव आणि छत्रपती संभाजीनगर या जागांबाबत महायुतीत नेमका काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठवाड्यात शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी ताकद आहे. येथे शिवसेनेचा एक खासदार आणि तब्बल 10 आमदार आहेत. तरीदेखील शिवसेनेला मराठवाड्यात समाधानकारक जागा मिळण्याची चिन्हे नाहीत. छत्रपती संभाजीनगराच्या जागेवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वांचं भाष्य केलंय. भाजपचा उमेदवार असेल की शिवसेनेचा असा विचार करण्यापेक्षा, हा विषय प्रतिष्ठेचा विषय करण्यापेक्षा जो जिंकून येईल त्याला जागा देण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हाच महायुतीचा फॉर्म्यूला आहे, असं बावनकुळे म्हणालेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरही हातातून जाते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   

Sambhaji Nagar

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Sambhaji Nagar
Share the Post:
error: Content is protected !!