ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Hinduja

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईमधील हिंदुजा या रूग्णालयात(Hinduja Hospital) त्यांना दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात(Hinduja Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हिंदुजा रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. याआधीसुद्धा मनोहर यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला. मात्र पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे काल हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.

मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय विश्वासाचे आणि जवळचे सहकारी मानले जायचे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक संविधानिक पदे भूषविली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं.  मनोहर जोशी यांनी नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता परत एकदा त्यांना रूग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.(Hinduja Hospital)

Hinduja

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Hinduja
Hinduja

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Hinduja
Share the Post:
error: Content is protected !!