ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Pankaj Udhas

ज्येष्ठ गायक पंकज उधास(Pankaj Udhas) यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. नुकताच पंकज उधास यांचे निधन झाले आहे. याबाबतची पोस्ट त्यांच्या मुलीने शेअर केलीये.

 बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक पंकज उधास(Pankaj Udhas) यांचं निधन झालं. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड सिनेसृष्टीसाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं. दीर्घ आजारानं त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पंकज यांची मुलगी नायाब उधास हिनं त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी गायलेल्या गझल प्रसिद्ध झाल्या. ‘चिठ्ठी आई हे ये’ या त्यांच्या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. पंकज यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

पंकज यांच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. “सगळ्यांना हे सांगायला खूप दु:ख होत आहे की पद्मश्री पंकज उधास यांचं 26 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झालं. दीर्घकाळ आजारी होते”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी पंकज उधास यांच्या जाण्यानं दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिलंय, “नायब हे खूप धक्कादायक आहे. इतके प्रेमळ, दयाळू आत्मा आपल्या अंत:करणात अनंतकाळापर्यंत पाहिलं. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो! ओम शांती!”

पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 साली गुजरातच्या जेतपुर येथे झाला. तिन भावंडामधील पंकज(Pankaj Udhas) सर्वात छोटे भाऊ होते. राजकोट जवळील चरखाडी येथे त्यांचं कुटुंब राहत होतं. त्यांचे आजोबा जमीनदरा होते. त्यांचे भावनगर येथे दिवाणही होते. तर त्यांचे वडील केशुभाई हे सरकारी कर्मचारी होते. त्यांची आई जितुबेन यांच्या गाण्याची प्रचंड आवड होती. तसंच त्यांच्या दोन्ही भावांचा कल हा संगीताकडे होता.

Pankaj Udhas

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Pankaj Udhas
Pankaj Udhas

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Pankaj Udhas
Share the Post:
error: Content is protected !!