ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Accident

 Accident News : पुण्यातील नवले पुलाजवळ एक विचित्र अपघात झाला आहे. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे.(Accident)

Accident News : पुण्यातील नवले पुलाजवळ एक विचित्र अपघात झाला आहे. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. तरी यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला. या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली.

नवले पुल चौकातून राष्ट्रीय महामार्ग ६५ व ४८ वरील सर्व्हिस रस्ते जोडले जातात. कात्रज चौक ते नवले पुल हा रस्ता सहा पदरी असून तीव्र उताराचा आहे. नवले चौकात येणारी वाहने वेगात येतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस सिग्नलला उभे असलेल्या वाहनावर वेग नियंत्रित न झाल्यामुळे ब्रेक न लागल्याने जड वाहनांकडून सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना धडक देऊन गंभीर अपघाताचे प्रकार याआधी घडलेले आहेत.

नवले पुलास प्राप्त झालेल्या भौगोलिक उतारामुळे व घडलेल्या अपघातांच्या उपाय योजनेच्या दृष्टीकोनातून खालील उपाय करणे गरजेचे असल्याचे पत्र वाहतूक विभागाचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Accident

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Accident
Accident

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Accident

Share the Post:
error: Content is protected !!