ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Urban Bank

Urban Bank : नगर अर्बन बँक(Urban Bank) बचाव समितीचे संस्थापक राजेंद्र गांधी यांनी सोशल मिडियात जी पोस्ट केली, ती पोस्ट खूपच बोलकी आहे. ‘कोंबड कितीही झाकून ठेवलं तरी पहाट होणारच’, अशा आशयाची राजेंद्र गांधी यांची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Urban Bank : बँकिंग क्षेत्रातला मैलाचा दगड ठरलेल्या नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याचं सत्य अखेर बाहेर आलं आहे. या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या बँकेचे माजी संचालक आणि नगर अर्बन बँक बचाव समितीचे संस्थापक राजेंद्र गांधी यांनी सोशल मिडियात जी पोस्ट केली, ती पोस्ट खूपच बोलकी आहे. ‘कोंबड कितीही झाकून ठेवलं तरी पहाट होणारच’, अशा आशयाची राजेंद्र गांधी यांची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

राजेंद्र गांधी यांच्या या पोस्ट नुसार खऱ्या अर्थाने पहाट झाली असून नगर अर्बन बँकेतल्या(Urban Bank) आर्थिक घोटाळ्याचं सत्य नुसतं सत्य नव्हे तर कटू सत्य बाहेर यायला लागलं आहे. याचं कारण असं की शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच अमोल प्रभाकर वैकर याला अटक केली. पोलीस तपासात त्यानं जी धक्कादायक माहिती दिली आहे, ती खरोखरौच नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी मोठी आश्चर्यकारक आणि तितकीच संतापजनक आहे.

वैकर यानं पोलिसांना सांगितलं, की २ कोटी ६५ हजार रुपयांचं कर्ज मंजूर करण्यासाठी माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांना वैकर यानं २० लाख रुपये तर तत्कालीन व्यवस्थापकाला १० लाख रुपये अशा एकूण ३० लाख रुपयांचं वाटप केलं. ज्यावेळी राजेंद्र गांधी हे नगर अर्बन बँकेचे आर्थिक घोटाळ्याचा आरोप करत होते, त्यावेळी त्यांना मूर्खात काढलं जायचं. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला देखील करण्यात आला होता.

अर्थात नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांपासून वास्तव लपवण्यासाठी दडपशाहीदेखील करण्यात आल्याचं नगरकरांना त्यावेळी पाहायला मिळालं. मात्र वैकर यानं जे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात सांगितलं, त्यावरून नगर अर्बन बँकेत हजारो कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याच्या राजेंद्र गांधी यांच्या आरोपांना नक्कीच पुष्टी मिळत आहे. आता पोलीस तपासात आणखी काय काय वाढून ठेवलं आहे, हा नगर अर्बन बँकेच्या तत्कालीन पण सध्या जीवंत असलेल्या आणि नगरमधून फरार झालेल्या घोटाळेबाज संचालकांच्या हृदयाची खरं तर धडधड वाढविणारा हा प्रश्न आहे.

Urban Bank

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Urban Bank
Urban Bank

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Urban Bank
Share the Post:
error: Content is protected !!