ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Viral News

Viral News : तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यात महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Viral News : तेलंगणातील (Telangana) सिद्धीपेट जिल्ह्यात महामार्गावर एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी (24 फेब्रुवारी) घडली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सिद्धीपेट येथील कुकुनूर पल्ली येथे राजीव महामार्गावर धावणाऱ्या एका वेगवान कारचं नियंत्रण सुटलं. ती कार दुभाजकाला धडकली, त्यानंतर ती रस्त्याच्या विरुद्ध बाजूने दुसऱ्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कारला (Highway Accident) धडकली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.(Viral News)

या अपघाताचा व्हिडीओ (Accident CCTV Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक काळी गाडी दुभाजकाला आदळल्याचं दिसत आहे. दुभाजकाला आदळल्यानंतर गाडी हवेत उडाली. त्यानंतर ती दुभाजकाच्या पलीकडे जाऊन भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या गाडीला धडकली. दोन्ही गाड्या हवेत उडून खाली पडल्या. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे.गाड्यांची ही धडक कॅमेऱ्यात कैद झाली (Highway Accident Video) आहे. ही धडक खूप जोरदार होती. दुभाजक ओलांडणाऱ्या कारला महामार्गावर वेगात येणाऱ्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिल्याचं दिसून येत आहे. या अपघातामुळे महामार्गावर थोडा वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

अपघातात दोन्ही गाड्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या अपघातात सुमारे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत (Car Accident) आहे. चार जखमींपैकी दोन जण गंभीर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही रस्त्यांच्या मधोमध कोणताही अडथळा नसल्याने कार पलटी झाल्याचं दिसतंय. सरकार टोलच्या नावाखाली पैसे घेते आणि प्रवाशांना सुरक्षितता देण्यात अपयशी ठरते. रस्त्यावर गतिरोधक असता, तर एवढा मोठा अपघात टळला असता. भविष्यात असे अपघात होऊ नयेत. यासाठी सरकारने रस्ते सुरक्षा उपाययोजना वाढवायला हव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Viral News :

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Viral News :
Viral News :

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Viral News :
Share the Post:
error: Content is protected !!