ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Viral News

Viral News : नवऱ्या मुलाकडची मंडळी लग्नाच्या तयारीत व्यग्र असताना नवरी मुलगी मात्र बॉयफ्रेंडसह पळून गेली.

Viral News : लग्नसोहळा अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असतो आणि तेवढ्यातच अचानक नवरी मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून जाते, असा प्रसंग चित्रपटात पाहायला मिळतो; मात्र ज्यांच्या खऱ्या आयुष्यात असा प्रसंग घडला असेल, त्यांच्यावर काय वेळ ओढवली असेल, हे त्यांचं तेच जाणोत. नुकतीच उत्तर प्रदेशात बरेलीमध्ये अशी एक घटना घडली. नवऱ्या मुलाकडची मंडळी लग्नाच्या तयारीत व्यग्र असताना नवरी मुलगी मात्र बॉयफ्रेंडसह पळून गेली. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये गोंधळ उडाला असून, नवऱ्या मुलाकडच्या मंडळींनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून समेट घडवून आणण्यात आला. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी आता तिचा शोध सुरू केला आहे.(Viral news)

बरेली जिल्ह्यातल्या हाफिजगंज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या एका गावात ही घटना घडली आहे. 28 फेब्रुवारी रोजी वरात येणार होती. त्याआधीच नवरी मुलगी आपल्या बॉयफ्रेंडसह पळून गेली आहे. त्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. तिला खूप शोधूनही ती सापडलीच नाही. अखेर या प्रकाराची माहिती वर पक्षाकडच्या मंडळींना देण्यात आली.

नवऱ्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं, की त्यांच्या मुलाचा विवाह हाफिजगंज गावातल्या एका मुलीशी ठरला होता. 28 फेब्रुवारीला वर पक्ष वरात घेऊन जाणार होता. 27 फेब्रुवारीला वधू पक्षाकडची मंडळी नवऱ्या मुलाच्या घरी येऊन लग्नचढाई हा कार्यक्रम करणार होते. घरात सगळी तयारी पूर्ण झाली होती. पाहुणेमंडळी आली होती. स्वादिष्ट मिठाई, पदार्थ तयार झाले होते. घरात आनंदाचं वातावरण होतं. एवढी तयारी होती; मात्र वधूपक्षातली मंडळी आलीच नाहीत. अखेर त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता, त्यांनी सांगितलं, की त्यांची मुलगी न सांगता कुठे तरी निघून गेली आहे. हे ऐकताच वरपक्षाकडच्या मंडळींच्या पायाखालची वाळूच सरकली.(Viral news)

दोन्ही पक्षांच्या कुटुंबीयांमध्ये गावात पंचायत सुरू झाली. त्यातही काही तोडगा निघाला नाही, तेव्हा वर पक्षाने दोन दिवसांनंतर हाफिजगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांचा समेट घडवून आणण्यात आला. आधी वरपक्षाच्या मंडळींनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वधूपक्षाच्या मंडळींना बोलावण्यात आलं आणि त्यांच्यात समेट घडवण्यात आला, असं पोलिसांनी सांगितलं.

Viral News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Viral News
Viral News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Viral News
Share the Post:
error: Content is protected !!