ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

video

Viral video : अपंग असल्याचे भासवून तो लोकांकडून भिक मागत होता. एका वयोवृद्ध व्यक्तीला अपंग व्यक्ती करत असलेली फसवणूक समजल्यानंतर पुढे जे करतो ते कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Viral video : देशातील सर्वच शहरांमध्ये भिक्षेकरी नागरिकांची मोठी समस्या आहे. ही मंडळी रस्त्यामध्ये अडवून अनेकदा भीक मागतात. त्याचा अनेकांना त्रास होतो. मात्र आता एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये पैशांसाठी अपंगत्वाचे नाटक करुन भीक मागणाऱ्या तोतया भिकाऱ्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका भिकारी अपंग असल्याचे नाटक करत होता. अपंग असल्याचे भासवून तो लोकांकडून भिक मागत होता. एका वयोवृद्ध व्यक्तीला अपंग व्यक्ती करत असलेली फसवणूक समजल्यानंतर पुढे जे करतो ते कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

भिकारी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर मळलेल्या कपड्यातील आणि अस्वच्छ अवतारातील व्यक्ती येतो.आर्थिक परिस्थीती हलाखीची असल्यामुळं किंवा परिस्थितीमुळं शिक्षण न घेऊ शकल्यामुळं काही जणांवर भीक मागण्याची वेळ येते. मात्र, आता काही जणांनी भीक मागणे हा व्यवसाय म्हणून निवडला आहे.सामान्यत: भिकारी हा शब्द पैशाची अडचण, अन्न खायला नसते, फाटलेले जुने कपडे आणि विस्कटलेले केस यासारख्या समस्यांशी झगडणाऱ्या लोकांशी संबंधित असतो. भीक मागणे हा काही लोकांचा व्यवसाय झाला असून त्यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. अशाच एका तोतया भिकाऱ्याला एका व्यक्तीने चांगलीच अद्दल घडवली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती भिक मागण्यासाठी परिसरात पायावर बसून फिरत आहे. यावेळी एक वृद्द व्यक्ती घराबाहेर येते आणि त्यांना भिक मागणाऱ्या व्यक्तीवर संशय येतो. त्यामुळे त्याची शाळा घ्यायला सुरुवात करतात. सुरुवातील पायावर सरकत चालणारा हा भिकारी वृद्ध व्यक्तीने काठीने मारल्यानंतर पळून गेल्याचं दिसत आहे. चालायला येत नसल्याचं नाटक करणाऱ्या व्यक्तीच भिंग फुटलं आणि तो तिथून निघून गेला. हा व्हिडीओ पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

video

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

video
video

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

video
Share the Post:
error: Content is protected !!