ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Vitthal Rukmini Mandir

Vitthal Rukmini Mandir : पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर (vitthal rukmini mandir pandharpur) परिसरात मंदिर संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. या कामाच्या काळात देवाच्या मूर्तीला काचेचे आवरण केले जाणार आहे अशी माहिती विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने दिली.

Vitthal Rukmini Mandir : पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर (vitthal rukmini mandir pandharpur) परिसरात मंदिर संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. या मंदिरातील गाभारा दुरूस्तीसाठी येत्या शुक्रवारपासून (ता.15 मार्च) विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माध्यमांना दिली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या काम वेगाने सुरू झाले आहे. या मंदिरातील गाभारा दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.यामुळे मंदिर समितीने येत्या 15 मार्चपासून सुमारे दीड महिना देवाचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना देवाचे केवळ मुख दर्शन घेता येईल. या कामाच्या काळात देवाच्या मूर्तीला काचेचे आवरण केले जाणार आहे. मंदिरामध्ये सर्व नित्योपचार सुरू राहणार आहेत. सकाळी पाच ते 11 पर्यंत भाविकांना मुख दर्शन घेता येईल असेही मंदिर समितीने स्पष्ट केले.

Vitthal Rukmini Mandir

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Vitthal Rukmini Mandir
Vitthal Rukmini Mandir

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Vitthal Rukmini Mandir
Share the Post:
error: Content is protected !!