नेवासे फाटा – राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुकिंदपूर (नेवासे फाटा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.सुनीता भिमराज उपळकर यांची मंगळवार (दि.3) रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

मुकिंदपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच ठरल्याप्रमाणे फिरते ठेवण्यासाठी आणि सर्वांना समान संधी मिळण्यासाठी या ग्रामपंचायतीचे उपसरपंच कानिफनाथ गोरक्षनाथ कराडे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा देवून सौ.सुनीता उपळकर यांची या झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड केली ग्रामविकास अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष खंडागळे यांनी त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याची घोषणा यावेळी केली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.कल्पना सतिष निपूंगे या होत्या यावेळी सौ.सुनीता उपळकर यांच्या उपसरपंच नावाची सूचना सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने मांडल्याने ही निवड सर्वानुमते करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.वर्षा केदारे,भारती करडक,मंजना खंडागळे, सुनीता निपूंगे, प्रताप हांडे,विजय कांबळे,दीपक डमाळे,नंदा निपूंगे,अमोल घुले,मंदा इंगळे आदी सदस्य यावेळी बैठकीस उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंचपदी सौ.सुनीता उपळकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठया जल्लोषात फाटक्याची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली नवनिर्वाचित उपसरपंच सौ.सुनीता उपळकर यांचे या निवडीबद्दल मुकिंदपूर ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
