रुग्णवाहिका

नेवासा : जीवन – मरणाच्या दारात झुंज देणा:या रुग्णासाठी रुग्णवाहिका ही जीवन वाहिनीसारखी असते. मात्र नेवासा तालुक्यातील सुमारे ९० टक्के रुग्णवाहिका ‘आरोग्य’ बिघडलेल्या अवस्थेत आहे. वैद्यकीय उपकरणे व त्यासंदर्भातील सुविधांची तपासणी दूरच; मात्र 8 पैकी २२ रुग्णवाहिकांचे ‘आरटीओ’कडून नियमित ‘चेकअप’ केलेले नाही.अनेक रुग्णवाहिका तांत्रिकदृष्ट्या अनफिट असून, चालकांच्या अभावी रुग्णसेवेत व्यत्यय येत आहे, जसे की नेवासा तालुक्यातील काही उदाहरणे आहेत.

रुग्णवाहिका

रुग्णवाहिकांचे दोन प्रकार असतात. सर्वसामान्य प्रकारात रुग्णवाहिकेमध्ये पायाभूत उपचारांच्या सुविधा असतात. दुस:या प्रकारात अद्ययावत वैद्यकीय यंत्रणा असते. तालुक्यात पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. त्यामध्येही सर्वसाधारण यंत्रणा व उपकरणो आवश्यक असतात. मात्र, यामध्येही खासगी प्रकारात मोडणा:या रुग्णवाहिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही. रुग्णवाहिकांची जर नियमित तपासणी होत नसेल, तर अन्य सर्वसाधारण गाडय़ांची स्थिती अधिकच दुर्दैवी असणार आहे.

रुग्णवाहिका

तालुक्यात २२ रुग्णवाहिका अनफिट असून, त्यांची एकदाही नियमित तपासणी झालेली नाही. या गाडय़ांची मेकॅनिकल तपासणीची जबाबदारी ‘आरटीओ’ची आहे.   नव्या रुग्णवाहिकांची दोन वर्षानंतर आणि जुन्या रुग्णवाहिकांची दर वर्षी तपासणी आवश्यक आहे. नियमानुसार, कोणत्याही वाहनाने फिटनेस तपासणी केली नाही, तर ते अनफिट व बेकायदेशीर वाहन म्हणून घोषित केले जाते.

अशी होते तपासणी

‘आरटीओ’कडून रुग्णवाहिकेच्या सर्व पार्टची तपासणी होते. सुरक्षेशी संबंधित सर्व प्रमाणांवर ही गाडी योग्य असेल, तरच तिला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. त्यामध्ये सर्व तांत्रिक गोष्टींबरोबरच ब्रेक, क्लच, लाईट, टायर यांची स्थिती तपासली जाते. दर वर्षी होणा:या या तपासणीला तीनशे रुपये खर्च येतो.

रुग्णवाहिका

रुग्णवाहिकेमधील सुविधा

अॅम्ब्युलन्स दोन प्रकारच्या असतात. बेसिक लाइफ सपोर्ट आणि अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट. पहिल्या प्रकारात विशेष सुविधा नसतात. त्यांचा उपयोग रुग्णाची ने-आण करण्यासाठी होतो. दुस:या प्रकारात गाडय़ांमध्ये सिलिंडर, स्ट्रेचर, ईसीजी मशिन, सिरींज पंप, डेफिब्रिलेटर (हृदय यंत्रणा), बीपी मशिन, व्हेंटिलेटर, सक्शन मशिन, नेब्युलायझर, मास्क, फस्र्ट एड किट, नर्स, डॉक्टर आणि टेक्निशियन यांचा समावेश असतो.

रुग्णवाहिका बनली धंदा

रुग्णाला रुग्णालयात पोहोचविणो आणि त्या दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू ठेवण्यामध्ये रुग्णवाहिक महत्त्वाची भूमिका बजावतात. 

रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा आहे. मात्र, नियंत्रणाअभावी हा व्यवसाय होत आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक संस्थांकडून मोठय़ा रकमा घेऊन रुग्णवाहिका सुरू करण्यात येतात. मात्र, या गाडय़ा व्यवसायाचे साधन बनतात. त्यातून मनमानी पद्धतीने लूट करून, रुग्ण आणि नातेवाइकांची अडवणूक केली जाते. अनेक रुग्णवाहिकांमध्ये वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध नसतात.

महाराष्ट्रात २०२६ पासून आरटीओ (RTO) मध्ये वाहनांची, ज्यात रुग्णवाहिकांचाही (Ambulance) समावेश आहे, मॅन्युअल फिटनेस तपासणी बंद करण्यात आली आहे. आता फिटनेस प्रमाणपत्र केवळ ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (ATS) द्वारे दिले जाणार आहे, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि सुसज्ज रुग्णवाहिकाच रस्त्यावर धावतील.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रुग्णवाहिका
रुग्णवाहिका

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रुग्णवाहिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!