नेवासा – सन २०२५-२६ च्या खरीप हंगाम अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे १०० टक्के वाया जाऊनही ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना सहा महिन्यानंतरही विम्याचे संरक्षित रक्कम मिळालेली नाही. या प्रकरणी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांच्या कारभारावर शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नेवासा तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप हंगामात एकुण ९८ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले होते. या हंगामासाठी तालुक्यात १९ हजार ५६४ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. मात्र शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही पिक विम्याचा परतावा देण्यात विमा कंपन्याकडून चालढकल होत आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सहा ते सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई पोटी संरक्षित रक्कम मिळाली नाही. याचा परिणाम रब्बी हंगामासाठी तालुक्यात अवघे ५ हजार ४२२ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. त्यामुळे राज्य सरकार व विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ परतावा म्हणून विम्याचे पैसे द्यावे अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसाचा वाढता लहरीपणा व नैसर्गिक आपत्ती जोखीम व शेतीचे अनिश्चित शेती उत्पादन या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधार ठरणारी पीक विमा योजना असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास होणारी दिरंगाई यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत असल्याचे खरवंडी येथील शेतकरी बाबासाहेब भोगे यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सहा ते सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई पोटी संरक्षित रक्कम मिळाली नाही. याचा परिणाम रब्बी हंगामासाठी तालुक्यात अवघे ५ हजार ४२२ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. पीक विम्याच्या बाबतीतही चालढकल होत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

