
नेवासा- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान-नेवासा राज्यमार्गावरील हॉटेल किंग पॅलेस झालेल्या जवळ भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवार दि.४ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० च्या दरम्यान घडली.

सनी गोविंद रणनवरे (वय २२) असे मृत युवकाचे नाव असून लखन माळी ( वय २३) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मालवाहतूक करणारे आयशर कंपनीचे वाहन (एम.एच.१७सी.व्ही. ७३०५) श्रीरामपूरकडून संभाजीनगरकडे जात होते. त्याचवेळी टाकळीभान – नेवासारोडवरील हॉटेल किंग पॅलेस समोर दुचाकी (एम. एच १७ सी.सी. ९२५८) व मालवाहतूक करणारी आयशर यांच्यात समोरासमोर जोराची धडक होवून भीषण अपघात झाला. यामध्ये टाकळीभान येथील दुचाकीवरील सनी गोविंद रणनवरे (वय २२) याच्या डोक्याला जबर मार लागला.

जखमींना सनी यास प्रथम श्रीरामपूर, लोणी व शेवटी नगर येथे उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर लखन माळी (वय २३) हा अपघातात गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती गंभीर असून प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे उपचारार्थ दाखल सुरू आहेत. या अपघातात दुचाकीचा करण्यात आले असून त्याच्यावर उपचार पुढील या अपघातात दुचाकीचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

