
नेवासा – लांडेवाडी, शनिशिंगणापूर रस्त्यावरील लिपाने वस्ती व घावटे वस्ती परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागत असून नागरिकांनी धसका घेतला आहे. लिपाने वस्तीवरील रमेश लिपाने व उद्योजक जुगल बंग यांना बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगण्यात आले आहे.

लिपाने यांच्या दोन कुत्र्यांपैकी एका कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना घडली असून एका शेळीला जखमी केल्याचेही सांगण्यात आले. परिसरात वारंवार बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांना शेतीची कामे करण्यासही भीती वाटत असून रात्री आठ नंतर घराबाहेर पडण्यास लोक घाबरत आहेत. संबंधित वन विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी पहाटे फिरायला गेले असता जुगल बंग व रमेश लिपाने यांच्या समोर बिबट्या आडवा गेल्याने त्यांनी जीव मुठीत धरून घरी परतल्याचे सांगितले. त्यामुळे परिसरातील मार्गांवर अखंडित वीजपुरवठा ठेवावा तसेच वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जुगल बंग, किशोर बंग व रमेश लिपाने यांनी केली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

