ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

नेवासा – जिल्ह्यातील ७५७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार विस्तार अधिकारी दर्जाच्या प्रशासकांच्या हातात दिला जाणार ‘होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात सर्वच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशासकांच्या यांनी नियुक्त्या केल्या होत्या. मात्र, या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेवर सुनावणी होवून प्रशासक नेमण्याच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी गटविकास अधिकारी यांना पत्रक काढत प्रशासक नेमण्याची कार्यवाही न करण्याचे
आदेश काढले आहेत.

ग्रामपंचायत

नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे गट आणि गणातील इच्छुक डोळे लावून बसले आहेत. त्यातच, आता ७५७ ग्रामपंचायतींच्याही मुदती संपल्या आहेत. यामुळे संबंधित जिल्ह्यातील ७५७ ग्रामपंचायतींवरील ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे अधिकार हे प्रशासकांकडे दिले जाणार होते. यापूर्वी डिसेंबर २०२५ अखेर मुदत संपलेल्या ११६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबल्याने त्या ठिकाणी अगोदरच प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. आता आणखी ७५७ग्रामपंचायतींवर प्रशासन नेमले जाणार होत. या ठिकाणी कृषी, शिक्षण, पशुसंवर्धन विभागाचे विस्तार अधिकारी, पाणी पुरवठा उपअभियंता, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षक अशा संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त्या देण्यात येणार होत्या.

ग्रामपंचायत

मांत्र, प्रशासक नियुक्तीप्रकरणी अरविंद दळवी व इतर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होवून पुढील आदेश होईपर्यंत कार्यवाही न करण्याच्या सुचना न्यायालयाने दिल्याने त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासानाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही थांबवली आहे.

या ठिकाणी प्रशासक नियुक्तीला स्थगिती अकोले ५१, संगमनेर ९४, श्रीरामपूर २७, कोपरगाव २९, राहाता२५, राहुरी ४४, नेवासा ५९, शेवगाव ४८, पाथर्डी ७७, जामखेड ४९, श्रीगोंदा ५६, कर्जत ५४.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ग्रामपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!